IPL 2027 : आयपीएल 2027 सीजनची उत्सुकतता वाढत चालली आहे. सर्व संघांनी त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट मागच्या मंगळवारीच जाहीर केली. मात्र सनरायजर्स हैदराबाद संघाच्या गोटातून मोठे अपडेट्स येत आहेत. सनरायजर्स हैदराबादच्या एका खेळाडूने कर्णधार पॅट कमिन्सच्या आयपीएल 2027 खेळण्यावर मोठे अपडेट्स दिले आहेत. बिझी शेड्युल आणि वनडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी यापूर्वीच मिचेल स्टार्क आणि ट्रेविस हेड हे दोघे आधीच आयपीएलचा आगामी सीजनमधून बाहेर पडले आहेत. दोघांना त्यांच्या फ्रेंचायझींनी रिलीज केले आहे. मात्र पॅट कमिन्सला मात्र रिटेन केलं. त्यामुळे पॅट कमिन्स खेळणार असं बोललं जातंय, मात्र आता त्याच्या उपलब्धतेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आहे. फ्रँचायझीने त्याला संघातून मुक्त न करण्याचा निर्णय घेतल्यावरून हे स्पष्ट होते की, तो आयपीएल 2027 मध्ये सहभागी होईल. मिळालेल्या माहितीनुसार कमिन्सने स्वतः आपण खेळणार असल्याचे निश्चित केले आहे. मात्र त्याने असेही संकेत दिले आहेत की तो कदाचित केवळ काही निवडक सामन्यांतच खेळू शकेल.
सनरायजर्स हैदराबादमधील एका वरिष्ठ खेळाडूने क्रिकबजशी बोलताना याबाबत माहिती दिली. पॅट कमिन्स सोबत झालेल्या संभाषणानुसार त्या वरिष्ठ खेळाडूने सांगितलं की, 'मी कमिन्सशी बोललो, आणि त्याने सांगितले की तो आयपीएल खेळण्यासाठी नक्कीच भारतात येईल. पूर्ण हंगामासाठी नाही, तरी किमान काही सामन्यांसाठी तरी तो नक्कीच येईल'. मागच्या सीजनमध्ये सुद्धा पॅट कमिन्स हा आयपीएलचे काहीच सामने खेळला होता. तेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला खेळण्यासाठी परवानगी दिलेली नव्हती. तेव्हा पॅट कमिन्सने संपूर्ण सीजनमधील केवळ 8 सामने खेळले होते.
सनरायजर्स हैदराबाद रिटेन खेळाडूंची लिस्ट :
पॅट कमिंस,अभिषेक शर्मा, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, ब्रायडन कार्स, सलिल अरोड़ा, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, आर स्मरण, प्रफुल हिंगे
साकिब हुसैन, शिवांग कुमार, क्रेंस फुलेत्रा, ईशान मलिंगा, टी नटराजन, नेथन एलिस, खलील अहमद.
सनरायजर्स हैदराबाद रिलीज खेळाडूंची लिस्ट :
ट्रेस हेड, गेराल्ड कोएट्जी, जयदेव उनादकट, शिवम् मावी, आर अम्ब्रीश, कमिंडू मेंडिस, दिलशान मदुशंका, अमित कुमार, डेविड पेन, ओमकार तमाले