• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे दुःखद निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 22, 2026, 11:24 IST|Updated: Nov 22, 2026, 11:28 IST
joinshare
भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Image Credit: BJP Rajya Sabha MP Ramrao Wadkute passes away due to heart attack

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

2

'जिथे पाऊसच पडत नाही, तिथे अजितदादांना आणायचं का?' आनंदराज आंबेडकरांची जीभ घसरली; वक्तव्यामुळे नवा वाद!

3

30 कोटींचा प्रकल्प, 40 मीटर उंच कारंजे, लेझर शो अन् बरंच काही...; मुंबईकरांना मिळणार नवं पर्यटनस्थळ, कुठं आहे हे ठिकाण?

4

'फोटोवरुन वाद, अश्लील कमेंट्स अन्..', कुर्ल्यात तरुण-तरुणीला मारहाणीनंतर प्रत्यक्षदर्शींनी सांगितला धक्कादायक घटनाक्रम

5

मुंबईकरांनो थंडीत शेकोटी पेटवताय? BMCने जारी केली महत्त्वाची सूचना, दंडाची किंमत तब्बल...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भाजपचे जेष्ठ नेत आणि राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली.

आठ महिन्यापूर्वीच भाजपकडून रामराव वडकुते यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. अत्यंत प्रगल्भ आणि निष्कलंक  राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. शेळी मेंढी महासंघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिलं आहे. राज्यातील धनगर समाजाचे नेतृत्व करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. तसंच, निष्कलंक आणि भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती.

रामराव वडकुते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते होते आणि त्यांनी पक्षाच्या कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी आमदार असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, 2021 मध्ये त्यांची हिंगोली भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

रामराव वडकुते यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. 7 महिन्या पूर्वी भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. त्यांच्या निधनाने राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करत रामराव वडकुते यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'भाजपचे राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ नेते रामराव वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक सालस आणि साधे व्यक्तिमत्व राजकारणातून हरपले आहे.हिंगोली जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर त्यांनी अनेक जबाबदाऱ्या भाजपामध्ये सांभाळल्या. धनगर समाजासाठी मोठे काम त्यांनी केले.'

भाजपचे राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ नेते रामराव वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक सालस आणि साधे व्यक्तिमत्व राजकारणातून हरपले आहे. हिंगोली जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर त्यांनी अनेक जबाबदाऱ्या भाजपामध्ये सांभाळल्या. धनगर समाजासाठी मोठे काम त्यांनी केले. शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. सहकारात सुद्धा त्यांनी आपल्या नेतृत्वाची छाप पाडली. तळागाळातील समाजासाठी त्यांची कणव सातत्याने जाणवायची. एक साधे आणि समर्पित व्यक्तिमत्व त्यांच्या जाण्याने आपल्यातून निघून गेले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति 🙏

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 22, 2026

 

ते पुढे म्हणाले की, 'शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. सहकारात सुद्धा त्यांनी आपल्या नेतृत्वाची छाप पाडली. तळागाळातील समाजासाठी त्यांची कणव सातत्याने जाणवायची.' 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
BJP
Marathi News
News in Marathi