IND VS NZ Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम परफॉर्मन्स करून अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. या दरम्यान भारताने न्यूझीलंड विरुद्ध 720 धावा करून भारताने केले 5 मोठे कारनामे केले. तेव्हा याबाबत जाणून घेऊयात.
1/6
9 विकेट गमावून 720 धावा करून इनिंग घोषित
वेलिंग्टनच्या बेसिन रिजर्व मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यातील पहिल्या इनिंगमध्ये भारतीय संघाने 9 विकेट गमावून 720 धावा करून इनिंग घोषित केली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात अनेक मोठे रेकॉर्ड उध्वस्त करून भारतीय संघाने जबरदस्त प्रदर्शन केले. भारतीय फलंदाजांच्या या दमदार कामगिरीमुळे, टीम इंडियाने केवळ यजमान संघावर मोठी आघाडीच मिळवली नाही, तर मायदेशात आणि परदेशात अनेक जुने, ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.
2/6
भारतीय टेस्ट इतिहासातील तिसरा सर्वात मोठा स्कोअर
वेलिंगटनमध्ये भारतीयांनी बनवलेला 720 धावा या भारतीय टेस्ट इतिहासातील तिसरा सर्वात मोठा स्कोअर आहे. भारताची टेस्ट क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 759/7अशी आहे, जी 2016 मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध नोंदवण्यात आली होती. तर 2009 मध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध केलेली 726/9 ही धावसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेलिंग्टन येथील या डावाने कोलंबो 2010 मधील 707 धावा आणि सिडनी 2004 मधील 705/7 धावांच्या ऐतिहासिक धावसंख्यांना मागे टाकले आहे.
3/6
न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही संघाने आतापर्यंतची केलेली ही सर्वोच्च धावसंख्या
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही संघाने आतापर्यंतची केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. भारतीय संघाने 31 वर्षे जुना जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर होता. ज्यांनी 1995 मध्ये वेलिंग्टनच्या याच मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 5 विकेट गमावून 660 धावा केल्या होत्या.
4/6
न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या सर्वोच्च टीम स्कोअरचा रेकॉ
परदेशात इतिहास रचताना भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या सर्वोच्च टीम स्कोअरचा रेकॉर्ड सुद्धा आपल्या नावावर केला. याआधी, न्यूझीलंडमध्ये टेस्ट क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम यजमान न्यूझीलंडच्याच नावावर होता. त्यांनी 2019 मध्ये हॅमिल्टन येथे बांगलादेशविरुद्ध 6 विकेट गमावून 715 धावा केल्या होत्या.
5/6
टेस्ट क्रिकेटमध्ये 700 हून अधिक धावा
या प्रचंड धावसंख्येसह, भारतीय संघाने टेस्ट डावात 700 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा पराक्रम इतिहासात पाचव्यांदा नोंदवला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 700 हून अधिक धावा करण्याच्या बाबतीत भारत आता जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत श्रीलंका (7 वेळा) पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज (प्रत्येकी 4 वेळा), पाकिस्तान (2 वेळा) आणि न्यूझीलंड (1 वेळा) हे संघ भारताच्या मागे आहेत.
6/6
टेस्ट क्रिकेटमध्ये 149 वर्षांच्या इतिहासात आधी कधीच झालं नव्हतं
वेलिंग्टनच्या या इनिंगमध्ये भारतीय फलंदाजांनी एक अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा केला. टेस्ट क्रिकेटमध्ये 149 वर्षांच्या इतिहासात हे आधी कधीच झालं नव्हतं. या डावातील पहिल्या सातही विकेट्ससाठी 50 किंवा त्याहून अधिक धावांच्या भागीदारी नोंदवल्या गेल्या. एकूण सात वेळा 50 हून अधिक धावांच्या भागीदारी झाल्या. एका टेस्ट डावातील अशा भागीदारींच्या संख्येच्या बाबतीत हा संयुक्तपणे दुसरा सर्वाधिक आकडा आहे. याआधी 2007 मध्ये 'द ओव्हल' येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने आठ वेळा 50 हून अधिक धावांच्या भागीदारी केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियानेही 2025 /26 मध्ये सिडनी येथे इंग्लंडविरुद्ध अशाच सात भागीदारी नोंदवल्या होत्या.