SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'नेत्यांनी माझा गेम केला,' कराळे गुरुजींची शरद पवारांच्या NCP मधून 6 वर्षासाठी हकालपट्टी; ढसाढसा रडले

राष्ट्रवादी SP पक्षामधून कराळेंची 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर नितेश कराळे आक्रमक झाले आहेत.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 22, 2026, 06:42 PM IST | Updated: Oct 22, 2026, 07:05 PM IST
Image Credit: कराळे गुरुजींची शरद पवारांच्या NCP मधून 6 वर्षासाठी हकालपट्टी
Join

नितेश कराळेंना नागपूर पदवीधर मतदारसंघात बंडखोरी करणं चांगलचं भोवलं आहे. नितेश कराळेंची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांना अभिजीत वंजारींना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, कराळे निवडणूक लढण्यास ठाम असल्यानं त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी SP पक्षामधून कराळेंची 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर नितेश कराळे आक्रमक झालेत. मतदार मतदानातून उत्तर देईल आणि 27 तारखेला त्याचे परिणाम दिसतील, असा इशारा त्यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

कराळे गुरुजींनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात त्यांनी अर्ज भरला होता. पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी 22 ऑक्टोबर 2026 रोजी याबद्दलचे पत्र काढले. अभिजीत वंजारी यांना पक्षाचा पाठिंबा असतानाही कराळे यांनी अपक्ष अर्ज भरला. उमेदवारी कायम ठेवल्यामुळे पक्षशिस्त आणि महाविकास आघाडीच्या निर्णयांचे उल्लंघन झाले. कराळे मतदारांमध्ये ‘शरदचंद्रजी पवार साहेब यांचा मला पाठिंबा आहे,’ असा संभ्रम निर्माण करत असल्याच्या तक्रारी पक्षाला मिळाल्या होत्या. याची दखल घेऊन, वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार कराळे यांना पक्षातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

कराळे गुरुजींची पदवीधर मतदारसंघातील ही दुसरी निवडणूक आहे. 2020 मध्येही त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी त्यांना 6889 मते मिळाली होती. ‘खदखद सर’ म्हणूनही ते ओळखले जातात.

हकालपट्टी केल्यानंतर नितेश कराळे यांना अश्रू अनावर

पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर नितेश कराळेंना अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादी पक्षासाठी एवढं काम केलं असताना अनेक सभा मी लोकसभेसाठी, विधानसभेसाठी घेतल्या. महाविकास आघाडीसाठी काम केलं. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. मी जेलात होतो तेव्हा माझ्या बायकोला एकाही मोठ्या नेत्याचा फोन आला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हकालपट्टी झाली हा माझा पुरस्कार समजतो. परंतु सगळ्या नेत्यांनी मिळून माझा गेम केला. येत्या काळात मी सगळे नेत्यांची पोलखोल करणार आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे. मला जर अशी वागणूक मिळत असेल तर दाद कुठे मागायची अशी विचारणाही त्यांनी केली.

मतदार आपल्या मतदानातून उत्तर देतील. 27 तारखेला मतमोजणी सुरु झाल्यावर सगळ्या पक्षाच्या लोकांना समजेल की, विद्यार्थ्यांसाठी लढणाऱ्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाचं तिकीट कापलं तर काय परिमाण होतात असंही ते म्हणाले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES