SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कराळे मास्तर कुणाचाही गेम पलटवू शकतात! पराभूत होऊनही विजयी उमेदरवाची धाकधूक वाढवणारा महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी उमेदवार

Nitesh Karale: राष्ट्रवादीने तिकीट नाकारले तरीही लढले आणि पडले. पराभूत होऊनही नितेश कराळे मास्तरांनी भाजप आणि काँग्रेस दिग्गजांना जबरदस्त धक्का दिला आहे. कराळे मास्तर महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी उमेदवार ठरले आहेत.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 28, 2026, 06:17 PM IST | Updated: Oct 28, 2026, 06:30 PM IST
Join

Nitesh Karale Nagpur MLC Election Result 2026:  महाराष्ट्रात  विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांच्या निकालांचे चित्र आता स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत आले आहे ते कराळे मास्तर अर्थात नितेश कराळे.  पराभूत होऊनही नितेश कराळे मास्तरांचा भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांना जबरदस्त धक्का दिला आहे. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं, अशी फिल्मी डॉयलॉगबाजी नितेश कराळे यांनी केली आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीवर कराळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पराभव झाला असला तरी महाराष्ट्रात आपली चर्चा सुरु आहे. आपण कुणाचाही गेम पलटवू शकतो, असंही ते म्हणाले.

नागपूर पदवीधर निवडणुकीत नितेश कराळेंची कमाल

नागपूर पदवीधर मतमोजणीत अपक्ष उमेदवार वर्धेचे खदखद गुरुजींनी केली कमाल केली. मातब्बर पक्षांच्या उमेदवारांना नितेश कराळेंनी घाम फोडला. नागपूर पदवीधर मतमोजणीत एकीकडे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर सुरू असताना अपक्ष म्हणून रणांगणात उतरलेले खदखद गुरुजी नितेश कराळे यांनी पहिल्या पसंतीत तब्बल 24 हजार 249 मत घेत सगळ्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना जोरदार धक्का दिला. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत  कराळे गुरुजी किंगमेकर च्या भूमिकेत समोर आले.

ना भाजपसारखी संघटनात्मक ताकद यंत्रणा, ना काँग्रेसचा झेंडा तरीही कराळे गुरुजींनी घेतलेली झेप थक्क करणारी आहे. आणि भाजप आणि काँग्रेस नेत्यांनाही धक्का देणारी आहे.   आपल्या खास विदर्भयानशैलीत स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कराळे गुरुजींनी गेल्या पदवीधर निवडणुकीत  6 हजार  889  मत घेतली होती. 

सोशल मीडियावर तुफान चर्चेत असणारे कराळे गुरुजी 2026 मध्ये नागपूर पदवीधर साठी  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तिकीट मागत होते. पक्षाने ऐनवेळी हात वर केले. कराळेंनी थेट अपक्ष म्हणून तलवार उपसली. पक्षाने कारवाई केली तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि लढले. 

एकीकडे भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्याकरता खुद्द मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपच्या मातब्बर नेते प्रचार करताना दिसून आले. दुसरीकडे काँग्रेसने अभिजीत वंजारी सारखे चाणक्ष मातब्बर उमेदवार रिंगणात होते. मात्र त्यानंतरही नितेश कराळे यांनी पहिल्या पसंती घेतलेली  24 हजार 249 मते भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांसाठी दुसऱ्या पसंती मध्ये निर्णय ठरताना दिसत आहे.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES