SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नाशिक हादरलं! निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडेंच्या घरातून गोळीबाराचा आवाज आला अन्...दृश्य पाहून थरकाप उडाला

नाशिकमध्ये निवृत्त सहाय्यक मोटार परिवहन (RTO) अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी टोकाचे पाऊल उचले आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 20, 2026, 20:52 IST | Updated: Nov 20, 2026, 21:05 IST
Image Credit: Nashik rto officer
Join

नाशिकमध्ये निवृत्त सहाय्यक मोटार परिवहन (RTO) अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी स्वत:च्या घरात आत्महत्या केली. राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून त्यांनी जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ माजली आहे. हेमंत गोविंद हेमाडे यांचं घर सिटी सेंटर मॉल परिसरात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. हेमंत हेमाडे यांनी हा टोकाचा निर्णय घेतला याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहे.

नेमकं काय घडलं?

निवृत्त सहाय्यक मोटार परिवहन (RTO) अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांच्या घरातून गोळीबाराचा आवाज आला. गोळीबाराच्या आवाजाने शेजारच्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली तर हेमंत हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला. हेमंत गोविंद हेमाडे यांच्या या टोकाच्या पावलामुळे हेमाडे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची झाडाझडती घेतली पण कोणतीही सुसाईट नोट न सापडल्यामुळे आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES