• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /'मी करकपात केली, पण तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का?', PM नरेंद्र मोदींनी कंपन्यांना स्पष्टच विचारलं; 'तुम्हाला कितीही दिले तरी...'

'मी करकपात केली, पण तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का?', PM नरेंद्र मोदींनी कंपन्यांना स्पष्टच विचारलं; 'तुम्हाला कितीही दिले तरी...'

केवळ सरकारनेच विकासाची प्रक्रिया पुढे न्यावी अशी अपेक्षा ठेवण्याऐवजी, कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक केले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 20, 2026, 20:05 IST|Updated: Nov 20, 2026, 20:12 IST
joinshare
'मी करकपात केली, पण तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का?', PM नरेंद्र मोदींनी कंपन्यांना स्पष्टच विचारलं; 'तुम्हाला कितीही दिले तरी...'
Image Credit: तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का?', PM नरेंद्र मोदींची उद्योजकांना विचारणा

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
नाशिक हादरलं! निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडेंच्या घरातून गोळीबाराचा आवाज आला अन्...दृश्य पाहून थरकाप उडाला

नाशिक हादरलं! निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडेंच्या घरातून गोळीबाराचा आवाज आला अन्...दृश्य पाहून थरकाप उडाला

2

हिवाळ्यात इम्युनिटी आणि ऊर्जा वाढवायची? फक्त 40 रुपयांचे 'हे' कंदमूळ ठरेल आरोग्याचा खजिना!

3

'मी करकपात केली, पण तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का?', PM नरेंद्र मोदींनी कंपन्यांना स्पष्टच विचारलं; 'तुम्हाला कितीही दिले तरी...'

4

'मी विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय', पुण्यातील महिला डॉक्टरला अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून...काय नेमकं प्रकरण?

5

'माझ्याशी लग्न कर,' इन्फ्लुएनसर तरुणीच्या घरात घुसला तरुण; नंतर रुममध्येच...; धक्कादायक घटना; पोलीस आले तेव्हा जखमी अवस्थेत...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सरकारने कॉर्पोरेट करात पुरेशी सवलत दिली आहे. मात्र त्यामुळे पगारात वाढ झालेली किंवा नोकरींची निर्मिती झालेली दिसत नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कॉर्पोरेट क्षेत्राला मिळणारे फायदे देशातील खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. नवी दिल्ली येथे 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' (FICCI) च्या वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी यावेळी अधोरेखित केले की, सरकारने मूळ कॉर्पोरेट कर दर 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे आणि 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक पगारावर आयकरातून सूट दिली आहे.

"मला माहित आहे की तुम्ही टाळ्या वाजवणार नाही, कारण तुमची भूक इतकी मोठी आहे की, तुम्हाला कितीही दिले तरी ते कधीच पुरेसे नसते. मी 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर प्राप्तिकर सवलत दिली आहे. पण, तुम्ही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली का? किंवा त्यांचे पगार वाढवले ​​का? नाही. नेहमी असेच असते: 'मोदीजी, तुम्हीच करा; आम्ही बघू काय होते ते.' अशा प्रकारे गोष्टी सुरू राहणार आहेत का?", अशी विचारणा त्यांनी केली.

केवळ सरकारनेच विकासाची प्रक्रिया पुढे न्यावी अशी अपेक्षा ठेवण्याऐवजी, कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत असे मत त्यांनी यावेळी मांडले. त्यांनी सांगितले की, 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर मिळालेल्या आयकर सवलतीमुळे लोकांची खरेदीशक्ती वाढली आहे, ज्यामुळे मागणीत वाढ होऊन व्यवसायांचा विस्तार होण्यास मदत होईल.

त्यांनी यावर भर दिला की, कोणताही देश तेव्हाच प्रगती करतो जेव्हा तो आपल्या शेतकऱ्यांचा, संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा, लघु उद्योगांचा आणि करदात्यांचा आदर करतो. त्यांना दोष देऊन किंवा टीका करून प्रगती होत नाही. पंतप्रधान म्हणाले, "त्यांच्यावर टीका करून किंवा त्यांना अपशब्द वापरून कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही."

 

India's growth story is creating new opportunities. Our industries must be ready to seize them. Speaking at FICCI's centenary convention. @ficci_india https://t.co/tJCw2NnpjW

— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2026

 

पंतप्रधान मोदींनी उद्योगप्रमुखांनाअसा इशाराही दिला की, देशांतर्गत बाजारपेठ ही हमखास विक्री होणारी जागा आहे हा दृष्टिकोन त्यांनी सोडून दिला पाहिजे. त्याऐवजी, त्यांनी उत्पादनांचा दर्जा सुधारण्यावर आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पंतप्रधान पुढे म्हणाले, "आपली देशांतर्गत बाजारपेठ ही केवळ सोयीची जागा (Comfort Zone) न राहता, जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास देणारी ठरायला हवी."

पंतप्रधान मोदींनी यावेळी काही उत्पादनांना एक्सपोर्ट क्वालिटी म्हणून ब्रँडिंग करण्याच्या पद्धतीवरही टीका केली आणि म्हटले की, देशातील नागरिकांनाही दर्जेदार उत्पादने मिळायला हवीत. त्यांनी उद्योग क्षेत्रातील नेत्यांना इतर देशांशी केलेल्या व्यापार करारांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करण्याचे आवाहन केले. असे करार जागतिक बाजारपेठेची दारे उघडतात, ज्यामुळे भारतीय उद्योगांना मोठी संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

"गेल्या काही वर्षांत भारताने जगभरातील अनेक देशांशी व्यापार करार केले आहेत. 'फिक्की' (FICCI) च्या सदस्यांनो, तुम्ही कधी यावर शांतपणे विचार केला आहे का? जेव्हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांशी मुक्त व्यापार करार केले जातात, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुमच्यासाठी संधींची दारे उघडली गेली आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काही योजना आखली आहे का, की मला त्याबद्दलही मार्गदर्शन करावे लागेल?," असा प्रश्नही त्यांनी विचारला. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
PM Narendra Modi