SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुण्याच्या पुरंदरमधील 300 वर्ष जुनी परंपरा; हजारो भाविकांनी अनुभवला काटेबारसचा थरार

पुरंदरमधील गुळूंचे येथे हजारो भाविकांनी अनुभवला काटेबारसचा थरार अनुभवला. हर बोले हर हर महादेव चा गजर करत भाविकांच्या काट्यांचा ढिगार्‍यात उड्या घेतल्या. तीनशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून परंपरा चालत आली.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 21, 2026, 22:46 IST | Updated: Nov 21, 2026, 22:52 IST
Join

 पुणे :  पुण्यातल्या पुरंदरमधल्या गुळूंचे गावात आज काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रे निमित्त अनेक भक्तगणांनी बाभळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यांमध्ये उड्या घेत आपला देव भेटीचा मार्ग खुला केला.हजारो भाविकांनी हा काटेबारसीचा थरार अनुभवला.

लोकांच्या अंगावर काटे आणणारी ही काटे बारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.या काट्यांच्या ढिगाऱ्यात लोक स्वतःच्या मर्जीनुसार उड्या घेतात,त्यांना कोणी जबरदस्ती करीत नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा नसून तो एक प्रकारचा साहसी खेळ असल्याचे येथील लोक सांगतात.

या काटेबारसीच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते, शंभू महादेवाची म्हणजेच ज्योतिर्लिंगाची बहीण आसावरी ही रुसून गेली होती. तिला आणायला गेलेल्या ज्योतिर्लिंग यांनी पश्चाताप म्हणून काट्यांच्या ढीगाऱ्यात लोळण घेतलं आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू असल्याचे सांगितले जाते.

कार्तिकी एकादशी निमित्त महापूजा संपन्न

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध ताकई येथील बोंबल्या विठोबा मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त महापूजा संपन्न झाली... महापूजेनंतर कोकणातील खालापूरमधील प्रसिद्ध साजगावच्या यात्रेला सुरुवात झाली... पहाटेपासून विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या. ताकईच्या श्री विठोबा देवस्थानाच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात आलेत... संपूर्ण मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने भक्तिमय झाला. 

पंढरपूरमध्ये कार्तिक एकादशीचा सोहळा साजरा झाला. कार्तिकी एकादशीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरमध्ये दाखल झाले. दुष्काळाचे सावट या वारीवर असल्यामुळे भाविकांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळते. पहाटेपासूनच चंद्रभागेमध्ये स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली. चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून हे भाविक विठुरायाच्या पदस्पर्श आणि मुखदर्शन रांगेमध्ये जात असतात. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES