SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, नंतर रात्रभर...; अखेर सकाळी स्वत:च केला पोलिसांना फोन अन्...; हादरवणारी घटना

पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीत प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 23, 2026, 22:48 IST | Updated: Nov 23, 2026, 22:54 IST
Image Credit: पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या
Join

पुण्यात प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हादरवणारी बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकर रात्रभर प्रेयसीच्या मृतदेहाशेजारी बसून होता. यानंतर त्याने स्वत:च पोलिसांना फोन करुन आपण हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणीला रुग्णालयात नेलं. पण तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीत प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोमल डहाळे असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. तर शुभम ज्ञानेश्वर कालबांडे अशी तरुणीची ओळख पटली आहे. हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते एकत्र राहत होते. दोघांच्या लग्नालाही कुटुंबीयांची संमती होती. मात्र, शुभमचे दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून शुभमने कोमलला डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कोमलचा मृत्यू झाला.

धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर शुभम रात्रभर कोमलच्या मृतदेहाशेजारी बसून होता. सकाळी त्याने स्वतः 112 क्रमांकावर फोन करून हत्येची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कोमलला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी शुभमला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES