KL Rahul And Rishabh Pant : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना ड्रॉ झाला. पाचव्या दिवशी भारतीय संघाला 8 विकेटची गरज होती, तर न्यूझीलंडला सामना ड्रॉ करण्यासाठी संपूर्ण दिवस फलंदाजी करणं गरजेचं होतं. टीम इंडिया तीन विकेट घेऊ शकली मात्र डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्सने भारताला विजयापासून रोखण्यासाठी शेवटपर्यंत फलंदाजी केली. सामन्याचा निर्णय भारताच्या बाजूने लागला नसला तरी ऋषभ पंतने आपल्या कृतींनी प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच केलं.
23 नोव्हेंबरला सामन्याचा शेवटचा दिवस होता आणि न्यूझीलंड टेस्ट वाचवण्यासाठी फलंदाजी करत होते. ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिचेल यांनी केवळ बचावावर लक्ष केंद्रित करून भारताला विकेट्स घेऊ दिल्या नाहीत. जेव्हा सामना अनिर्णित राहणार असे वाटत होते, तेव्हा कर्णधार शुभमन गिलने आपल्या फलंदाजांना गोलंदाजीवर नेमले, ज्यात स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालचाही समावेश होता.
पंतने जयस्वालला चिडवलं :
ऋषभ पंत हा विकेटकिपर म्हणून विकेट्सच्या मागे उभं राहून काहीवेळा मैदानातील वातावरण हलकंफुलकं ठेवण्याचं काम करतो. सध्या ऋषभ पंत हा यशस्वी जयस्वालला चिडवतानाचा एक व्हिडीओ समोर येत आहे. त्याच्या आदल्याच दिवशी, पंतने जयस्वालच्या गोलंदाजीच्या शैलीची थट्टा केली होती. त्याने म्हटले होते की, 'जर कोणाला भयंकर ऍक्शन पाहायची असेल, तर त्यांनी जयस्वालला गोलंदाजी करायला सांगावे'. मात्र यावेळी पंतचे म्हणणं काही वेगळेच होते. जयस्वालने गोलंदाजी सुरू करताच, विकेट्सच्या मागून पंत ओरडला, 'ही आपली संधी आहे! त्याच्या (यशस्वी) विकेटकिपिंगबद्दल मला खात्री नाही, पण तो नक्कीच एक ऑलराऊंडर खेळाडू बनू शकतो आणि तोही अगदी झटपट!'. ऋषभ पंतने असं म्हणून यशस्वी जयस्वालला चिडवण्याचा प्रयत्न केला. काही आठवड्यांपूर्वीच, रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून मैदानात उतरण्यापूर्वी जयस्वाल विकेटकिपिंगचा सराव करताना दिसला होता. वनडे आणि टी20 संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात तो हे करत असल्याचे म्हटले जात होते.
This is the Reason why all Girlfriends of Rishab Pant left Please Keep him Away from KL Rahul, He is a Married man https://t.co/eHmkwb72BE
RunCraft_1KX (FormtoFormat) November 23, 2026
राहुलला किस करण्याचा प्रयत्न :
ऋषभ पंत यशस्वी जयस्वालची थट्टा करण्यापर्यंतच थांबला नाही तर त्याने केएल राहुल सोबत सुद्धा मस्करी केली. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान, केएल राहुल लिप बाम लावताना दिसला. पंतलाही तसेच करायचे होते, पण त्याने ग्लोव्हज घातले होते. मग पंतला एक गंमत सुचली आणि तो राहुलला किस करण्यासाठी पुढे सरसावला. राहुल त्याला पाहून मागे सरकला. मग पंत हसला आणि बाजूला झाला. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.