SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुण्यातील सिंहगड रोडवरील प्रसिद्ध स्टोअरवर एफडीएची मोठी कारवाई; लाडू-पेढ्यांवर बुरशी, केक-ब्रेड एक्सपायरी!

Pune FDA Action:पुण्यात अमेझॉन आणि बिग बास्केटच्या डार्क स्टोअर्समध्ये मुदत संपलेले लाडू, पेढे, केक-ब्रेड आणि अस्वच्छता आढळली. एफडीएने दोन्ही केंद्रांचे अन्नव्यवसाय परवाने निलंबित केले.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 22, 2026, 06:24 IST | Updated: Nov 22, 2026, 06:38 IST
Image Credit: एफडीएची कारवाई
Join

ऑनलाइन किराणा मागवताना तुम्हीही खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासता का? पुण्यात अमेझॉन  आणि बिग बास्केटशी संबंधित दोन डार्क स्टोअर्सच्या तपासणीत मुदत संपलेले पदार्थ, बुरशी आणि अस्वच्छ साठवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने दोन्ही केंद्रांचे अन्नव्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर काही मिनिटांत घरपोच किराणा मिळवून देणाऱ्या क्विक कॉमर्स सेवांचा वापर वाढत आहे. मात्र, जलद डिलिव्हरीसोबतच खाद्यपदार्थांची साठवणूक आणि गुणवत्ता याबाबतही काळजी घेणे आवश्यक आहे. पुण्यातील ताज्या कारवाईने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

पुण्यातील सिंहगड रोडवर एफडीएची तपासणी

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने 21 नोव्हेंबर रोजी पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील अमेझॉन  आणि बिग बास्केटशी संबंधित डार्क स्टोअर्सची तपासणी केली. या तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर अन्नसुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत दोन्ही केंद्रांचे अन्नव्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले.

अमेझॉनच्या स्टोअरमध्ये लाडू-पेढ्यांवर बुरशी

अमेझॉनसाठी काम करणारे गजानन इन्व्हेंटरीजचे डार्क स्टोअर तपासले असता मुदत संपलेले लाडू, पेढे आणि इतर खाद्यपदार्थ आढळले. काही पदार्थांवर बुरशी वाढल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. खाद्यपदार्थांच्या डब्यांमध्ये धूळ साचली होती. तुपाच्या एका डब्याचे झाकण तुटलेले होते, तर तेलाच्या पॅकिंगमधून गळती होत होती. कीटक नियंत्रणाची योग्य व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेसंबंधी नोंदीही अपुऱ्या असल्याचे तपासणीत समोर आले.

बिग बास्केटमध्ये एक्सपायरी केक, ब्रेड आणि रस्क

बिग बास्केटसाठी काम करणाऱ्या इनोव्हेटिव्ह रिटेल कॉन्सेप्टच्या केंद्रात मुदत संपलेले केक, ब्रेड, मिल्क रस्क आणि चटणी आढळली. काही खाद्यपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आले होते. स्टोअरमधील फरशी खराब होती, तर कोल्ड रूममध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून आला. तेलाच्या पाकिटांतून गळती आणि कीटक नियंत्रणातील त्रुटीही आढळल्या.

खाद्यपदार्थांसोबत साबणासारख्या वस्तूंची साठवणूक

दोन्ही केंद्रांमध्ये खाद्यपदार्थ आणि बिगरखाद्य वस्तू एकाच ठिकाणी ठेवल्याचे आढळले. अमेझॉनच्या केंद्रात साबण आणि तुपाचे डबे एकत्र साठवले होते. अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी आवश्यक स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि योग्य व्यवस्था न पाळल्याने ग्राहकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

हॉटेल्ससह सर्व अन्नव्यवसायांनी परवान्याच्या अटी, स्वच्छता आणि साठवणुकीचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ग्राहकांनी ऑनलाइन किराणा मागवल्यानंतर पॅकेटवरील उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम तारीख, पॅकिंगची स्थिती आणि साठवणुकीच्या सूचना तपासाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. मुदत संपलेला किंवा खराब झालेला पदार्थ मिळाल्यास तो खाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित अॅपवर तक्रार नोंदवून परतावा मागण्याबरोबरच अन्नसुरक्षा विभागाकडेही तक्रार करता येते, याची ग्राहकांनी नोंद घ्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES