एकनाथ शिंदे नाराज आहेत? पत्रकार परिषद संपल्यानंतर प्रश्न ऐकताच फडणवीस माघारी फिरले, म्हणाले...
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदेंची शिवसेना सचिन सानप यांच्या पाठीशी तर भाजप आणि मित्रपक्ष कौस्तुभ गावडे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार असल्याचं समजत आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदेंची शिवसेना सचिन सानप यांच्या पाठीशी तर भाजप आणि मित्रपक्ष कौस्तुभ गावडे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार असल्याचं समजत आहे. पुण्यातून शिवसेनेने मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र नंतर माघार घ्यावी लागली. यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास विभागाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. दरम्यान यानंतर ते महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी भाजपा आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेनंतर ते निघत असतानाच एकनाथ शिंदेंच्या नाराजीबद्दल प्रश्न ऐकून ते माघारी फिरले. "एकनाथ शिंदे नाराज नाहीत, तुम्हीच सर्वजण नाराज आहेत. उगाच त्यांच्याबद्दल अफवा पसरवू नका," असं त्यांनी मिश्किलपणे म्हटलं.
हे ही वाचा - मोठी बातमी! पुण्यात मेडिकल कॉलेजसाठी केंद्राकडून परवानगी; फडणवीसांनी केलं जाहीर
महायुतीमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा सुरू आहे... वर्षा निवावसस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कचरामुक्त शहरं आणि सीबीजी प्राधान्य मोहिमेचा आढावा घेतला. दरम्यान या बैठकीला एकनाथ शिंदेंनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं आणि यानंतरच एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
बैठकीला गैरहजेरी, शिंदेंची नाराजी?
सोमवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी जाणं टाळल्याची चर्चा
बैठकीवेळीच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतल्याचं पाहायला मिळालं
स्वतःच्या विभागाची बैठक असतानाही बैठकीला जाण्याचं टाळल्याने शिंदे नाराज असल्याच्या चर्चा
पत्रकार परिषद घेत असल्याने बैठकीला येत नसल्याचा निरोप दिल्याची एकनाथ शिंदे यांची
माहिती
रविवारी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीलाही राहिले होते गैरहजर
एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवरून विरोधकांनी टोला लगावला आहे. शिंदे गावाला गेलेत की इथेच आहेत? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. शिंदे मुंबईत असतील तर ते नाराज नाहीत असं म्हणत देशपांडेंनी त्यांना डिवचलं आहे. तर एकनाथ शिंदे दरेगावात गेले तरी काहींच्या पोटात दुखतं असं म्हणत उदय सामंतांनी संदीप देशपांडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिंदे का गेले नाहीत? कारण त्यावेळी एकनाथ शिंदे देखील मुंबईत होते. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीनं त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्यात यानंतर स्वत: एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. महायुतीमध्ये समन्वय आणि चांगला संवाद कोणताही विसंवाद नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. दुस-या कामात किंवा कार्यक्रमात मी असेल, एकमेकांवर आमचा विश्वास असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.