• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /मोठी बातमी! पुण्यात मेडिकल कॉलेजसाठी केंद्राकडून परवानगी; फडणवीसांनी केलं जाहीर

मोठी बातमी! पुण्यात मेडिकल कॉलेजसाठी केंद्राकडून परवानगी; फडणवीसांनी केलं जाहीर

पुण्यात मेडिकल कॉलेजसाठी केंद्राकडून मान्यता मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 14, 2026, 07:38 PM IST|Updated: Oct 14, 2026, 08:02 PM IST
joinshare
मोठी बातमी! पुण्यात मेडिकल कॉलेजसाठी केंद्राकडून परवानगी; फडणवीसांनी केलं जाहीर
Image Credit: पुण्यात मेडिकल कॉलेजसाठी केंद्राकडून परवानगी

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यात मेडिकल कॉलेजसाठी केंद्राकडून मान्यता मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पुण्यात बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "आपल्या ESIC रुग्णालयाला मेडिकल कॉलेज करण्यासाठी एक प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दोन वेळा हा प्रस्ताव नॅशनल मेडिलक काऊन्सिनलने तो नाकारला होता. आपण यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांकडे अपील केलं होतं. आजच त्यांनी ते अपील मान्य केलं असून, एमबीबीएसच्या 50 जागांकरिता मेडिकल कॉलेजला मान्यता दिली आहे. यामुळे पुणेकरांची मागणी पूर्ण झाली आहे. यासाठी त्यांनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. 

यावेळी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, "आज यासंदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांसोबत बैठक झाली. पुणे पदवीधरमधून डॉक्टर स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे हे दोघे भाजपा आणि महायुतीच्या वतीने मैदानात आहेत. यासंदर्भात चांगली तयारी झाली आहे. शरद लाड आणि भैय्या माने यांनीही चांगली तयारी केली होती. दोघांनी आमच्या विनंतीला मान देत स्मिता पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरात भैय्या माने यांनी कमान सांभाळली आहे. शरद लाड यांनी सांगली जिल्ह्यापासून तयारी केली होती. त्यांनी ती कमान सांभाळली आहे. भाजपाचे सर्व आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करतील विधान परिषेदच्या पाचही जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील". 

 

🕡 6.42pm | 14-10-2026📍Pune. LIVE | Media Interaction #Maharashtra #Pune https://t.co/Fb42ubRguZ

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 14, 2026

 

"नागपूर, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक हे मतदारसंघ भाजपा लढवत आहे. भाजपा आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्यांना निवडून आणतील. अमरावती शिक्षकमध्ये शिवसेनेची जागा आहे. तिथे सर्व कार्यकर्ते शिवसेनेला निवडून आणतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जागा गेली आहे. तिथेही भाजपा, शिवसेना आणि महायुतीचे कार्यकर्ते मिळून राष्ट्रवादीला निवडून आणतील असा मला विश्वास आहे. पाचही जागा आमच्या निवडून येतील हा मला विश्वास आहे. त्यादृष्टीने आजच्या बैठकीत जी तयारी पाहिली ती समाधानकारक आहे," असंही त्यांनी सांगितलं. 

आंदोलकांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी

"हे वर्ष फार अडचणीचं आहे. एकीकडे ऊस कमी आहे त्यामुळे साखर कारखान्यांचा हंगाम लहान होणार आहे. दुसरीकडे साखर कमी असल्याने हंगाम लवकर सुरु करायचा आहे. त्यासाठी कारखाने प्रयत्न करत आहे. तिसरीकडे मागील सगळ्या अडचणींमुळे कारखानेही अडचणीत आहेत. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे 99 टक्क्यापेक्षा जास्त एफआरपीचं पेमेंट झालं आहे. देशात कुठेही इतकं पेमेंट होत नाही. सातत्याने केंद्रानेही एफआरपी वाढवली आहे. कारखाने अडचणीत असताना आणि ऊसही कमी आहे अशा स्थितीत अधिक अडवणूक न करता लवकरात ललकर काऱखाने सुरु झाले पाहिजेत. ऊसाचा गाळप सुरु झाला पाहिजे. आंदोलकांना माझी विनंती आहे की, महाराष्ट्रात आपण कारखाने बंद ठेवतो तेव्हा मोठ्या संख्येने कर्नाटकचे कारखाने महाराष्ट्रातून ऊस घेऊन जातात. यामुळे आपल्या कारखान्यांचा हंगाम कमी होतो. म्हणून या अडचणी त्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे दुष्काळाचं वर्ष असून, शेतकरी होरपळला आहे. अशावेळी सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे," असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Devendra Fadnavis
Pune