SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? तुकाराम मुंढे यांचे एका शब्दात उत्तर

मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न तुकाराम मुंडे यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 22, 2026, 22:24 IST | Updated: Nov 22, 2026, 22:24 IST
Join

तुकाराम मुंढे :   तुम्हाला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का?असा सवाल पुण्यातील कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांना विचारला. यावेळी हा केवळ विश लिस्टचा भाग असून मी वस्तुस्थितीत जगणं पसंत करतो, असं उत्तर मुंढेंनी दिलं. पुण्यात यूथ फेस्टिव्हलमध्ये तुकाराम मुंढेंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का, असा सवाल तुकाराम मुंडे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी, मुख्यमंत्री होण्याची इच्छा ही केवळ 'विश लिस्ट'चा भाग आहे. मी विश लिस्टमध्ये राहत नाही, तर वास्तवात जगतो, असं स्पष्टीकरण दिले.  मी एक लोकसेवक आहे आणि केवळ नोकरीपुरतं मर्यादित न राहता आपली भूमिका समजून ती जगण्याचा प्रयत्न करतो, असंही मुंडे म्हणाले. प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा जपणं, हीच माझी जीवनाची व्याख्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मोठी कारवाई

हेल्थ सप्लिमेंट्स, प्रोटीन पावडरबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने नियमावली जारी केलीय. आता प्रोटीन पावडर किंवा हेल्थ सप्लिमेंट्स परवानगीशिवाय विक्री केल्यास कारवाई होणार आहे. जीम, फिटनेस सेंटर्सना विक्रीसाठी लायसन्स बंधनकारक असणार आहे. FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्याचबरोबर दिशाभूल करणारी जाहिरातबाजी केल्यासही दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं तुकाराम मुंढेंनी म्हटलंय.

तुकाराम मुंढे यांच्या बंगल्यावर दरोडा

दिवा शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास पडलेल्या एका दरोड्यामुळे खळबळ उडाली. डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले. तर, त्याचं झालं असं दिव्यातील आगासन गावात व्यावसायिक तुकाराम मुंडे यांच्या बंगल्यावर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला. मध्यरात्री २ ते पहाटे ५ च्या दरम्यान खिडकी आणि ग्रील उचकटून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. यावेळी लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. ही बातमी समोर येताच लोकांना तुकाराम मुंडे म्हणजे डॅशिंग आयपीएस अधिकारी तुकाराम मुंढे वाटले अन् सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. सामान्यांसह यंत्रणांचीही त्यामुळे धांदल उडाली. मात्र, तपासाअंती हा गोंधळ नामसाधर्म्यामुळे झाल्याचं समोर आलं आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES