SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'भाषणं पाठ करुन...', जयंत पाटलांनी मंचावरुनच पडळकरांना सुनावलं, महाराजांचा उल्लेख करत म्हणाले 'पुढच्या वेळी जरा...'

पुढच्या वेळी चांगला अभ्यास करा असा टोला जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांना लगावला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 05, 2026, 08:50 AM IST | Updated: Nov 05, 2026, 09:00 AM IST
Image Credit: जयंत पाटलांनी मंचावरुनच पडळकरांना सुनावलं
Join

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील निकालानंतर राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. सांगलीच्या बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी दोघांच्याही समर्थकांनी घोषणाबाजी करत काही काळ गोंधळ घातला. तसंच दोन्ही नेत्यांनीही आपल्या भाषणातून एकमेकांवर अप्रत्यक्ष टीका केली. यादरम्यान जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांच्या भाषणातील एक चूक सुधारत पुढच्या वेळी चांगला अभ्यास करा असा टोला लगावला,

गोपीचंद पडळकर यांनी भाषणावेळी सांगितलं की, अफजलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळागडाच्या पायथ्याशी काढला. तसंच शत्रू कितीही मोठा असला तरी घाबरायचं नाही असं सांगत जयंत पाटलांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यानंतर जयंत पाटलांनी पडळकरांच्या इतिहासावरून खोचक टोला लगावला आहे, अफजलखानाचा कोथळा पन्हाळगडाच्या नव्हे, तर प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला, असं सांगताना त्यांनी पुढच्या वेळी जरा चांगला अभ्यास करून या असा टोला लगावला. ते म्हणाले की, "पुढच्या वेळी जरा चांगला अभ्यास करुन या. पाठ केलेले भाषण केले की असे होते".

हे ही वाचा - 'आपण सुसंस्कृतपणानं....', जयंत पाटील आणि पडळकर आमने-सामने येताच गोंधळ, तुफान घोषणाबाजी, अखेर व्यासपीठावरुन उठले अन्...

यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांना आपली संस्कृती कधी सोडायची नाही असा सल्लाही दिला. "कायम एक लक्षात ठेवायचं. कधी चिडायचं नसतं आणि आपली संस्कृती कधी सोडायची नसते. कोणाला काहीही करायचं असलं तरी आपली संस्कृती ही आहे की, आलेल्या माणसाची सन्मानाने परत जाण्याची व्यवस्था करायची", असं ते म्हणाले.

 

 

जयंत पाटलांनी आयोजकांना पडळकरांचा सत्कार करण्यास सांगितलं

गोपीचंद पडळकर यांची कार्यक्रमस्थळी एंट्री होताच गोंधळ उडाला, जयंत पाटील व गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जयंत पाटील व्यासपीठावर असतानाच गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आल्याने गोंधळ उडाला.

 

 

दरम्यान गोंधळानंतर जयंत पाटलांनी आपल्या समर्थकांना शांततेचं आवाहन केल्यानंतर घोषणाबाजी थांबली. आपण सुसंस्कृतपणानं वागायचं असतं, आपल्या दारात कोणी आलं तर त्याचा सन्मान करायचा असतो असं जयंत पाटील यांनी समर्थकांना सांगितलं. इतकंच नाही तर त्यांनी आयोजकांना व्यासपीठावर गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करायला लावत, दोन्ही बाजूने सुरू असलेली घोषणाबाजी थांबवली.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES