महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल पाहिला मिळतोय. बंगाल खाडीतील वादळामुळे हवामानात हा बदल पाहिला मिळत आहे. अर्णब आणि मुरासु वादळामुळे हवामानात मोठे बदल झाले असून याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावरही पाहिला मिळत आहे. दिवाळीला सुरुवात झाली आहे, पण तरीदेखील थंडीची कुठलीही चाहूल नाही. तर उलट हवामान विभागाने कुठे पावसाचा तर कुठे कडक उष्णतेचा अलर्ट दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अंदाज वर्तविला आहे की, मुरासु वादळामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गुरुवारी म्हणजे आज वसुबारसेच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हवामानात चढ - उतार पाहिला मिळेल. तर अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवविला आहे की, गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर शुक्रवार धनत्रयोदशीपासून वातावरण कोरडे जाणवणार आहे.
हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या आज हवामान कोरडे राहू शकतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वातावरण कोरडे असले असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाचा अंदाज आहे की, गुरुवारी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतही थंडीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. इथेही वातावरण गुरुवारी कोरडे राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता नाही. तर इथेदेखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान साधारण कोरड असेल. तर कोल्हापूर परिसरातही वातावरण कोरडेच राहणार आहे.
पण ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी आज विदर्भात मात्र पावसाची शक्यता वर्तवली आहे. यवतमाळ, वर्धा, वाशीम, गडचिरोली, वाशीम, नागपूर या ठिकाणी आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसामुळे काही ठिकाणी गारवा तात्पुरता जाणवणार आहे. पण थंडीची कोणतीही चाहुल इथेही सध्या दिसत नाहीय. विदर्भासह दक्षिण महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर हलक्या स्वरुपाचा पावसाचे चिन्ह आहे.