SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दिवाळी आली पण थंडी गायब! तापमानात चढ-उतार, या ठिकाणी पाऊस; IMDचा अंदाज

आज दिवाळी पहिला दिवस तरीदेखील थंडीची चाहुलही नाही. उलट अनेक राज्यात अनेक ठिकाणी हवामान विभागाने ढगाळ वातावरण, पाऊस अगदी उन्हाचा कडाका जाणवणार आहे, असा अंदाज व्यक्त केली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 05, 2026, 08:01 AM IST | Updated: Nov 05, 2026, 08:39 AM IST
Image Credit: maharashtra weather
Join

महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल पाहिला मिळतोय. बंगाल खाडीतील वादळामुळे हवामानात हा बदल पाहिला मिळत आहे. अर्णब आणि मुरासु वादळामुळे हवामानात मोठे बदल झाले असून याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावरही पाहिला मिळत आहे. दिवाळीला सुरुवात झाली आहे, पण तरीदेखील थंडीची कुठलीही चाहूल नाही. तर उलट हवामान विभागाने कुठे पावसाचा तर कुठे कडक उष्णतेचा अलर्ट दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अंदाज वर्तविला आहे की, मुरासु वादळामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

गुरुवारी म्हणजे आज वसुबारसेच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हवामानात चढ - उतार पाहिला मिळेल. तर अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवविला आहे की, गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर शुक्रवार धनत्रयोदशीपासून वातावरण कोरडे जाणवणार आहे.

कोकणात कसं असणार आहे वातावरण? 

हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या आज हवामान कोरडे राहू शकतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वातावरण कोरडे असले असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

उत्तर महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

हवामान विभागाचा अंदाज आहे की, गुरुवारी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतही थंडीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. इथेही वातावरण गुरुवारी कोरडे राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात कोरडे हवामान!

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता नाही. तर इथेदेखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान साधारण कोरड असेल. तर कोल्हापूर परिसरातही वातावरण कोरडेच राहणार आहे.  

विदर्भात पावसाची शक्यता!

पण ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी आज विदर्भात मात्र पावसाची शक्यता वर्तवली आहे. यवतमाळ, वर्धा, वाशीम, गडचिरोली, वाशीम, नागपूर या ठिकाणी आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसामुळे काही ठिकाणी गारवा तात्पुरता जाणवणार आहे. पण थंडीची कोणतीही चाहुल इथेही सध्या दिसत नाहीय.  विदर्भासह दक्षिण महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर हलक्या स्वरुपाचा पावसाचे चिन्ह आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES