SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'आपण सुसंस्कृतपणानं....', जयंत पाटील आणि पडळकर आमने-सामने येताच गोंधळ, तुफान घोषणाबाजी, अखेर व्यासपीठावरुन उठले अन्...

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवत जयंत पाटील यांना मोठा धक्का दिला आहे. दोघांमधील राजकीय वैर सर्वश्रुत असून, या निकालानंतर दोन्ही नेते आमने सामने आले होते.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 05, 2026, 07:13 AM IST | Updated: Nov 05, 2026, 07:30 AM IST
Image Credit: पडळकरांची एंट्री होताच गोंधळ, जयंत पाटलांच्या समर्थकांची तुफान घोषणाबाजी
Join

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असा संघर्ष पाहायला मिळाला. जयंत पाटलांनी सर्वपक्षीय सत्तेचा समीकरण मांडताना, गोपीचंद पडळकर यांना जिल्हा बँकेच्या राजकारणापासून बाहेर ठेवण्याची खेळी रचली. भाजपाला सोबत घेताना पडळकर यांना मात्र बँकेत रोखण्यासाठी निवडणुकीचे मैदान तयार केलं. पण गोपीचंद पडळकरांनी बाजी मारत जयंत पाटलांच्या वर्चस्वाला शह देत 
टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केला. दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर सर्वश्रुत असून, या निकालानंतर दोन्ही नेते आमने सामने आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला.

नेमकं काय झालं?

सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या बावचीमध्ये आमदार जयंत पाटील, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत एकाच व्यासपीठावर आले होते. गोपीचंद पडळकर यांची कार्यक्रमस्थळी एंट्री होताच गोंधळ उडाला, जयंत पाटील व गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जयंत पाटील व्यासपीठावर असतानाच गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आल्याने गोंधळ उडाला.

जयंत पाटील समर्थक व गोपीचंद पडळकर- खोत समर्थकांकडून एकमेकांच्या विजयाच्या  घोषणा देण्यास सुरुवात झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर आमदार जयंत पाटील यांच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमांमध्ये गोपीचंद पडळकरांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

नेमका कार्यक्रम काय होता?

बावची येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार जयंत पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील, आमदार हर्षदा देशमुख यांनी उपस्थिती लावली होती.

दरम्यान गोंधळानंतर जयंत पाटलांनी आपल्या समर्थकांना शांततेचं आवाहन केल्यानंतर घोषणाबाजी थांबली. आपण सुसंस्कृतपणानं वागायचं असतं, आपल्या दारात कोणी आलं तर त्याचा सन्मान करायचा असतो असं जयंत पाटील यांनी समर्थकांना सांगितलं. इतकंच नाही तर त्यांनी आयोजकांना व्यासपीठावर गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करायला लावत, दोन्ही बाजूने सुरू असलेली घोषणाबाजी थांबवली.

 

पडळकरांचा विजय, जयंत पाटलांना धक्का

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गोपिचंद पडळकरांनी चक्रव्यूह भेदत एकतर्फी बाजी मारली. 88 पैकी 54 मतं घेऊन पडळकरांनी मविआच्या विनोद पवारांचा 20 मतांनी पराभव केला.

दुष्काळाच्या मुद्द्यावर जयंत पाटलांनी सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाचं बिगुल वाजवलं. 21 पैकी 15 जागा बिनविरोध निवडून आणल्या. मात्र खऱ्या दुष्काळी तालुक्यांमध्ये 6 जागांवर निवडणुका लागल्या. पण यात सर्वाधिक गाजली, ती गोपीचंद पडळकर यांची निवडणूक. 
कारण सांगली जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय गणितामध्ये जयंत पाटलांनी खेळी करत आपले कट्टर विरोधक गोपीचंद पडळकर यांना निवडणुकीच्या मैदानात पद्धतशीर उतरवलं. पण गोपीचंद पडळकरांनीही दणदणीत विजय मिळवत जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात जयंत पाटलांच्या वर्चस्वाला हादरा दिला.


एक नजर टाकूया जिल्हा बँकेच्या 21 जागा,पक्षीय बलाबलवर

काँग्रेस - 6

भाजपा - 5

राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार - 4

शिवसेना शिंदे पक्ष - 3

राष्ट्रवादी अजित पवार - 2

अपक्ष - 1
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES