SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पंढरपुरातील राजाभाऊ भिंगे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; नऊ वर्षांपूर्वी मिरजेत कोयत्याने..., गुजरातपर्यंत पोहोचले पोलीस; तपासात धक्कादायक खुलासे

शिवा संघटनेचा अध्यक्ष सराईत गुन्हेगार राजेंद्र उर्फ राजाभाऊ दत्तात्रय भिंगे यांच्या गोळीबार करून केलेल्या हत्येप्रकरणी फरार झालेल्या तीन संशयितांना गुजरातमधील अहमदाबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 20, 2026, 16:11 IST | Updated: Nov 20, 2026, 16:19 IST
Image Credit: पंढरपुरातील राजाभाऊ भिंगे हत्या प्रकरणाला नवे वळण
Join

शिवा संघटनेचे अध्यक्ष सराईत गुन्हेगार राजेंद्र उर्फ राजाभाऊ दत्तात्रय भिंगेची गोळीबार करून हत्या केल्या प्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. हत्येनंतर फरार झालेल्या तीन संशयितांना गुजरातमधील अहमदाबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तर अन्य दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणातील संशयितांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. दरम्यान, 2017 मध्ये मिरज येथे नगरसेवक नामदेव भोईटे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच भिंगेची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे

पोलिसांच्या तपासात या हत्येमागे नऊ वर्षांपूर्वीचा वाद असल्याची माहिती समोर येत आहे. नगरसेवक नामदेव भोईटे आणि राजाभाऊ भिंगे यांच्यात पूर्वी मैत्रीचे संबंध होते. मात्र, 2017 मध्ये मिरज येथे भोईटे यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात राजाभाऊ भिंगेला मुख्य सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली होती. या खटल्यातून त्याची नंतर निर्दोष मुक्तता झाली होती. त्याच जुन्या प्रकरणाचा राग मनात धरून भिंगे याची हत्या करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.

17 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास राजाभाऊ भिंगे जेवणानंतर इसबावी परिसरातील आपल्या घराजवळ शतपावली करत होता. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली असून, संभाव्य टोळीयुद्धाच्या भीतीने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. या प्रकरणात तात्या उर्फ प्रवीण देविदास शिंदे (रा. झेंडे गल्ली) याला 18 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर अनिकेत गवळी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले

या हत्येतील मुख्य संशयित वैभव ज्ञानेश्वर फसलकर (रा. व्यासनारायण झोपडपट्टी, पंढरपूर), स्वप्नील अहिरे (रा. पंढरपूर) आणि रोहन नागे (रा. हडपसर) हे हत्येनंतर गुजरातमध्ये पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांची पथके गुजरातमध्ये रवाना झाली. अखेर अहमदाबाद येथून या तिघांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले

तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी या कारवाईची माहिती दिली. ताब्यात घेतलेल्या तिघांना अहमदाबाद न्यायालयात हजर करून कायदेशीर परवानगी घेतल्यानंतर पंढरपूरला आणण्यात येणार आहे. पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर आता या हत्येमागील नेमका कट, जुन्या वैमनस्याची पार्श्वभूमी आणि इतर सहभागी व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES