SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुणे शहरातील पहिला रोप वे! सारसबाग-पर्वती अंतर फक्त अडीच मिनिटात पार होणार; एकाचवेळी 1500 जणांचा प्रवास

शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेने सारसबाग ते पर्वती रोप-वे प्रकल्प प्रस्तावित केला आहे. प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करणे, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासणे आणि निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 31, 2026, 10:28 PM IST | Updated: Oct 31, 2026, 10:33 PM IST
Join

पुणे : पुणे शहरातील पहिला रोप वे सवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. सारसबाग ते पर्वती रोप-वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी दिली. सारसबाग-पर्वती अंतर फक्त अडीच मिनिटात पार होणार आहे. 

प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करणे, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासणे आणि निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेने सारसबाग ते पर्वती रोप-वे प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यासाठी 2026-27 च्या अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रोप-वे प्रकल्प इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल तंत्रज्ञानावर आधारित असल्याने महापालिकेकडे आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या नियोजनापासून निविदा प्रक्रियेपर्यंतची जबाबदारी सल्लागारावर सोपविण्यात येणार आहे.
सल्लागार नियुक्तीसाठी महापालिकेने ऑगस्ट 2026 मध्ये निविदा मागविल्या होत्या. सल्लागाराला प्रकल्पाच्या रकमेच्या 1.27 टक्के किंवा किमान दोन कोटी 54 लाख रुपये यापैकी अधिक असलेली रक्कम शुल्क म्हणून देण्याचे प्रस्तावित आहे. त्यावर जीएसटी आणि अन्य लागू कर अतिरिक्त असतील.

सल्लागाराकडून प्रकल्पाच्या जागेची पाहणी, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), अंदाजपत्रक आणि निविदेच्या अटी-शर्ती तयार करण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय परवानग्यांची प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) किंवा डीबीएफओटी पद्धतीने राबविणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल का, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. निविदांमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांचे तांत्रिक आणि आर्थिक मूल्यमापन करून कार्यादेश देण्यापर्यंतची प्रक्रिया सल्लागारामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रस्तावित आराखड्यानुसार पेशवे पार्क ते पर्वतीदरम्यान सुमारे 750 मीटर लांबीचा रोप-वे उभारण्याचे नियोजन आहे. या मार्गावर 12 ते 40 मीटर उंचीचे पाच टॉवर आणि प्रत्येकी आठ प्रवाशांची क्षमता असलेल्या २२ केबिन प्रस्तावित आहेत. या रोप-वेमुळे अवघ्या अडीच मिनिटांत पर्वती गाठता येणार असून, एका दिशेने ताशी दीड हजार प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. सल्लागाराच्या अहवालानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

असा असेल प्रस्तावित रोप-वे

- मार्ग : पेशवे पार्क ते पर्वती
- लांबी : 750 मीटर
- टॉवर : 5
- टॉवरची उंची : 12 ते 40 मीटर
- केबिन : 22
- प्रत्येक केबिनची क्षमता : 8 प्रवासी
- प्रवासाचा कालावधी : अडीच मिनिटे
- वाहतूक क्षमता : एका दिशेने ताशी 1,500 प्रवासी

सल्लागाराकडे या जबाबदाऱ्या

- प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासणे.
- सविस्तर प्रकल्प अहवाल आणि अंदाजपत्रक तयार करणे.
- पीपीपी आणि डीबीएफओटी पद्धतींचा अभ्यास करणे.
- आवश्यक शासकीय परवानग्यांसाठी मार्गदर्शन करणे.
- निविदांचे मूल्यमापन करून कार्यादेशापर्यंतची प्रक्रिया पूर्ण करणे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES