पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पतीनंतर आता कुणाला आणि कधी अटक होणार? पोलीसांनी थेट नावच सांगितले
पुण्यात पायल झांबरे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून पायल झांबरेने संपवलं जीवन. पती अक्षय झांबरेला अटक झाली आहे. आता कुणाला अचक होणार याबाबत पुणे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी माहिती दिली आहे.
पुणे क्राईम : पुण्यात एका 29 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. पायल झांबरे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पायल झांबरे नामांकित झांबरे पॅलेच्या मालकाची सून असल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती अक्षय झांबरे याला अटक केली आहे. पुढील कारवाईबाबात पुणे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली.
पुण्यातील पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी इतर आरोपींना करा, अन्यथा आम्ही नँशनल हायवे वर रास्तारोको करू असा इशारा तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिला.आज तिचे सर्व नातेवाईक हे स्वारगेट पोलीस स्टेशनला आले होते. त्यावर मयत मुलीचा नवरा ऑलरेडी अटकेत असून त्याला 7 नोव्हेंबर पीसी देखील मिळालीय तर सासरे यांचा दवाखान्यातून डिस्चार्ज होताच त्यांनाही अटक करू, असं आश्वासन पुणे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले. हुंडाबळीच्या जाचातूनच आमच्या मुलीने आत्महत्या केल्याचा तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे या अनुषंगाने तपास सुरु असल्याचे पुणे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला संताप
पुण्यातील पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत सुप्रिया सुळे यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुण्यातील मुकुंदनगर भागात राहणाऱ्या उच्चशिक्षित पायल झांबरे यांची आत्महत्या मन हेलावून टाकणारी आहे. दरवर्षी दिवाळीला 5 ते 10 तोळे सोने आणण्यासाठी आणि हुंड्यासाठी सासरच्यांकडून त्यांचा छळ केला जात होता, असा गंभीर आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे.
पायल यांच्या पश्चात त्यांची चार वर्षांची निष्पाप मुलगी असून, तिच्या डोक्यावरून आईचे छत्र कायमचे हिरावले गेले आहे, हे अतिशय दुःखद आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात आजच्या काळातही एका उच्चशिक्षित महिलेला हुंडा आणि सोन्याच्या लोभापोटी अशा अमानुष छळाला सामोरे जावे लागणे, हे अत्यंत संतापजनक व लाजीरवाणे आहे.
पुणे शहर पोलीस व संबंधित तपास यंत्रणांनी या प्रकरणाची केवळ आत्महत्या म्हणून नोंद न करता, माहेरच्यांनी केलेल्या छळ व घातपाताच्या आरोपांची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी. यासोबतच फरार असणारे संशयित आणि त्यांना आसरा देणाऱ्यांवर देखील कारवाई करावी. पायल यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी ठोस प्रयत्न करावेत आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा.
या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण पायलच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली!