SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सिग्नल यंत्रणेत बिघाड केला अन् मध्यरात्रीच्या अंधारात निर्जनस्थळी महालक्ष्मी एक्स्प्रेस लुटली, तीन महिलांचे दागिने लुटले

मध्यरात्रीचा अंधार अन् निर्जनस्थळी थांबलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस, चोरट्यानी डाव साधत दरोडा टाकला. यात तीन महिलांचे दोन लाखांचे दागिने लुटले आहेत.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 02, 2026, 08:16 AM IST | Updated: Nov 02, 2026, 08:40 AM IST
Image Credit: Robbery in Mumbai Kolhapur Mahalaxmi Express
Join

मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत दरोडा घातल्याची घटना घडली आहे. जवळपास, पाच ते सहा महिला प्रवाशांचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील सालपे स्थानकाजवळ हा थरार रंगला.

सिग्नल यंत्रणेत बिघाड

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड घडवून आणला. त्यानंतर रेल्वे थांबवण्यात आली. आरक्षित डब्यातील महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. यावेळी चोरट्यांनी एस-2, एस-3 आणि एस-4 डब्यांवर दगडफेकही केली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तीन महिलांचे दागिने लंपास

प्राथमिक माहितीनुसार, सुनीता गोरक्षनाथ तुपे, यांनी मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहप्रवासी सुरेखा बाबासाहेब खाडे यांचेही दागिने चोरीला गेले आहेत. कोल्हापूर येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी प्रवास करणाऱ्या तीन महिलांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. इतकंच नव्हे तर, मध्यरात्रीचा अंधार आणि रेल्वे थांबलेली असताना अचानक दरोडेखोर आत घुसल्याने प्रवाशांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले होते. 

रेल्वेतून प्रवास करत होते दरोडेखोर?

मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांच्या टोळीतील काही सदस्य सिग्नल यंत्रणेजवळ थांबले होते. तर काही जण रेल्वेतूनच प्रवास करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच, रेल्वे थांबवण्यासाठी सिग्नल यंत्रणेत बिघाड कसा करण्यात आला, याचा तपासही करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसंच, लूटमारीनंतर रेल्वेवर करण्यात आलेली दगडफेक हा गंभीर विषय आहे.

मिरज पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून रेल्वे पोलिसांचे पथक चोरट्यांचा माग काढण्यासाठी सातारा जिल्ह्यात रवाना झाले आहेत. या प्रकरणी मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES