एका विवाहित महिलेने तिच्या दोन प्रियकरांच्या मदतीने खूनी खेळ खेळला आहे. 25 वर्षीय या विवाहित महिलेने दोन बायफ्रेंडच्या मदतीने पतीचा हत्या केली आहे. तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. या महिले आपल्या दोन्ही बॉयफ्रेंडला घरी बोलवलं आणि त्यानंतर नवऱ्याची हत्या केली. या तिघांनी त्याला दारूचं आमिष दाखवून घराबाहेर बोलवालं. त्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचे मृतदेह एका तलावात फेकला.
त्यानंतर 23 ऑक्टोबर 2O26 रात्री गावाबाहेर पचेरा चेरुवू तलावात अनोळखी व्यक्ता मृतदेह आढळला. पोलिसांनी तपास केल्या समोर आलं की त्याचे नाव गुम्मडी काशीराम आहे. तर तो 26 वर्षांचा होता. पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. काशीरामचे वडील चकली भूमैया यांनीही पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर काशीरामचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिची हत्या झाल्याचे समोर आलं. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्ह्याची नोंद करून मारेकऱ्यांचा शोध सुरु झाला.
पोलिसांच्या तपासात असं समोर आलं की, काशीरामची पत्नी गुम्मडी सविता हेचं त्याच गावातील चिंताकिंदी रामू आणि पसुपुला संतोष या दोन तरुणांसोबत विवाहबाह्य संबंध होते. सविताला पतीपासून सुटका हवी होती म्हणून तिने दोन बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याच्या हत्येचा कट रचला. त्यांनी काशीरामचा मृतदेह तलावात फेकला ज्यामुळे हा एक अपघात वाटेल. पण पोलिसांनी त्यांच्या हा कथित कट उघडकीस आणला.
पोलिसांनी या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि इतर वस्तूही जप्त केल्या आहेत. तर पोलिसांनी या तिघांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.