पुण्यात मराठा महासंघाच्या पदाधिकारी भिडल्या, रेखा कोंडे आणि आरती मारणेंमध्ये मारहाण; नेमकं काय घडलं?
पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा महासंघाच्या पदाधिकारी महिलांमध्ये हाणामारी झाली.
पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी मराठा महासंघाच्या महिला पदाधिका-यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. रेखा कोंडे आणि आरती मारणे पवार या दोन्ही पदाधिका-यांमध्ये मारहाण झाली आहे. तसंच दोन्ही महिला पदाधिका-यांनी एकमेकींवर गंभीर आरोप केले आहेत.
रेखा कोंडेंनी काय गंभीर आरोप केला?
ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांनी गंभीर आरोप करताना म्हटलं की, माझ्या नवरा गेलेला असताना त्या बाईने एका महिलेला माझ्याविरुद्ध उभं केलं आणि तिच्याकडून माझी बदनामी केली. तिची कुठलीही बदनामी मी केलेली नाहीय. कारण मी महिलांसाठी काम करते. या महिलेने माझ्या नवरा नसताना खोटे आरोप केलेत. हिला नवऱ्याने सोडलं आहे. माझा नवरा जाऊन १८ वर्ष झाली आहे. मी एकटी काम करते. या सगळ्याचा फायदा उचलून ती माझ्यावर वारंवार आरोप करते. ती महिला माझ्यावर जळते. तिला माझं काम बघवत नाही. मी महिलांसाठी काम करते, हे तिला बघवत नाही. मारणे नावाची महिला आहे, ती मराठा महासंघासाठी काम करते. मी मराठा महासंघाच्या वरच्या पदावर हे तिला बघवत नाही.
हेसुद्धा वाचा - 'मी विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय', पुण्यातील महिला डॉक्टरला अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून...काय नेमकं प्रकरण?
काय म्हणाल्या आरती मारणे?
रेखा कोंडे यांच्या आरोपावर पुणे शहर अध्यक्षा आरती मारणे म्हणाल्यात की, मला एका व्यक्तीने रेकॉर्डिंग पाठवली. त्याने ती रेकॉर्डिंग व्हायरल केली. त्यात यांचं काय म्हणं आहे माझे चार नवरे आहेत. मी कोणावर तरी बलात्काराची केस केली आहे. त्यासोबत या रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं की या पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी आरती मारणेंसोबत त्यांच्या मुलीही होत्या. माझ्या नवरा आणि नंणद देखील येत आहेत. यांना कोणी अधिकार दिला महिलांना बदनाम करण्याचा? आमच्याबद्दल ती घाण घाण बोलत आहे. खा कोंडे हिने आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप मारणे यांनी केला आहे.