SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अभिजित बिचुकलेंना किती मतं पडली पाहिलं का? पुण्यात प्रचारादरम्यान, 'शिक्षकांसाठी वाटेल तो संघर्ष करेन' असा दिलेला शब्द

अभिजित बिचुकले यांनी यापूर्वीही अनेक निवडणुका लढवल्या असून ते अत्यंत जोमाने प्रचार करताना दिसतात. यंदाही त्यांनी शिक्षक मतदारसंघासाठी जोरदार प्रचार केला होता. मात्र निवडणुकीत त्यांना किती मतं मिळाली पाहिलं का?

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 28, 2026, 01:44 PM IST | Updated: Oct 28, 2026, 01:56 PM IST
Image Credit: बिचुकलेंना किती मतं मिळाली? (प्रातिनिधिक फोटो)
Join

पुणे शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे कौस्तुभ गावडे यांचा मोठा विजय झाला आहे. कौस्तुभ गावडे यांनी शिंदे शिवसेनेनं पुरस्कृत केलेले उमेदवार सचिन सानप यांचा पराभव केला आहे. अटीतटीच्या लढतीत गावडे यांचा मोठ्या मताधिक्यांनी विजय झाला आहे. एकीकडे गावडे आणि सानप यांच्यातील चुरस चर्चेत असतानाच याच मतदारसंघातून अभिजित बिचुकलेही निवडणुकीच्या रिंगणात होते. अभिजित बिचुकलेंना या निवडणुकीमध्ये नेमकी किती मतं मिळाली? याचा नेमका आकडा समोर आला आहे.

आक्रमक भूमिका

आपल्या अनोख्या व चित्रविचित्र विधानांमुळे, कपड्यांच्या स्टाईलमुळे आणि प्रत्येक निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरणारे अभिजीत बिचुकलेंना पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्येही अर्ज भरला होता. त्यांनी आक्रमक प्रचारदेखील केला होता. शिक्षकांच्या प्रश्ननांसंदर्भात आक्रमक भूमिका मांडणाऱ्या अभिजीत बिचुकलेंनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आपण लढा देऊ असं सांगितलं होतं. शिक्षकांसाठी वाटेल तो संघर्ष करण्यास आपण तयार असल्याचं नमूद केलेलं. "मी निवडून आलो तर तुम्हाला (शिक्षकांना) रस्त्यावर आंदोलन करावं लागणार नाही. तुमचे नेतृत्वचं लेचेपेचे आहे. नेता हा डॉ. अभिजित बिचुकलेसारखाच असावा," असं बिचुकलेंनी भाषणामध्ये म्हटलं होतं.

बिचुकलेंना किती मतं मिळाली?

शिक्षकांसाठी उभं राहण्याचा शब्द देणाऱ्या बिचुकलेंना प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये मात्र मोठा धक्का बसला आहे. बिचुकलेंना अवघी 19 मतं मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून बिचुकलेंचं आवाहन पहिल्या काही फेऱ्यानंतरच संपुष्टात आलं. बिचुकले यापूर्वी अनेकदा विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीलाही उभे राहिले आहेत. मात्र त्यांच्या पदरी कायम निराशाच आली आहे. असं असलं तरी त्यांनी निवडणूक लढवण्याची जिद्द सोडली नाही हेच आजच्या निकालामधूनही दिसून येत आहे.

बिचुकले उभ्या राहिलेल्या मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

पुण्यातील मतदान केंद्रावरून बाहेर पडताना शिवसेना शिंदे गट पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या समोरच भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. "येऊन येऊन येणार कोण... कौस्तुभ गावडेंशिवाय आहेच कोण," अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी आचारसंहितेच्या नियमांचा भंग केलाय, असा आरोप सचिन सानप यांनी केलेला. "भारतीय जनता पक्षाचा गमछा घालून त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला व मतदान केले. या सर्व प्रक्रियेत त्यांना कोणत्याही यंत्रणेने अथवा निवडणूक आयोगाने अडवले नाही. तसेच भोर येथील एका केंद्रावर संग्राम थोपटे पैसे वाटप करत असल्याचे आढळून आल्याचा आरोपही सानप यांनी केला होता.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES