SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण, सिया आणि चेतनला पाहून काय म्हणाले उज्वल निकम? पहिल्याच सुनावणीत काय घडलं?

केतन अग्रवाल हत्याप्रकरणी कोर्टात सुनावणी पार पडली. पहिल्याच सुनावणीत सरकारी वकिल उज्वल निकम यां आरोपी सिया आणि चेतन यांना चांगलाच इशारा दिला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 31, 2026, 10:02 PM IST | Updated: Oct 31, 2026, 10:09 PM IST
Join

Pune pune lohagad ketan agrawal Case : पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा खटला कोर्टात सुरु झाला आहे. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी  केतनची हत्या केल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी सिया, चेतन यांच्या सह त्याचा आणखी एक मित्र रितेश हंगे याला अटक केली आहे. या प्रकरणात सरकारी वकिल उज्वल निकम यांची निुक्ती करण्यात आली आहे. पहिल्याच सुनावणीत  उज्वल निकम यांनी आरोपींना मोठा इशारा दिला आहे.   

केतन अग्रवाल हत्याप्रकरणी पुढील सुनावणी 17 नोव्हेंबरला होणार आहे. सहआरोपी रितेश हांगे याला वकील उपलब्ध नसल्याने पुढील सुनावणी 17 नोव्हेंबरला होणार आहे. आजच्या सुनावणीला सिया आणि चेतन ऑनलाईन हजर होते. सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांकडून दोन जामीन अर्ज न्यायालयात सादर करण्यात आले.  मात्र,  सरकारी पक्षाला बाजू मांडण्याची संधी मिळेपर्यंत या जामीन अर्जांवर विचार करू नये, अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी कोर्टाकडे केली.

सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तीनही आरोपी सियागोयल चेतन चौधरी आणि रितेश हंगे हे सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. मात्र, या सुनावणी दरम्यान या तिघांच्याही चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचं पश्चाताप दिसून येत नव्हता. मात्र 17 नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणी दरम्यान या तिघांनाही समजेल की त्यांच्या विरोधातील नेमके कोणते कोणते पुरावे आहेत असा इशारा उज्वल निकम यांनी दिला. 

सिया आणि चेतन विरोधात दोघांविरोधात कोर्टात 5500 पानांचे आरोपत्र 

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिसांनी  सिया आणि चेतन विरोधात दोघांविरोधात कोर्टात 5500 पानांचे आरोपत्र दाखल केले आहे. यात पोलिसांनी डिजीटल पुराव्यांचा उल्लेख केला आहे. 18 जून 2026 रोजी लोणावळा येथील लोहगडावरुन पडून केतन अग्रवाल याचा मृत्यू झाला. केतनची  होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला लोहगडाच्या दरीत ढकलल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES