पुण्यातील हॉटेलच्या त्या रूमध्ये रक्तरंजित थरार, तरुणाच्या कपाळावर..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील खराडी परिसरातील एका हॉटेलमध्ये धक्कादायक घटना उघडली आहे. एका तरुणाने आपलं आयुष्य संपवलं आहे.
पुण्यातील खराडी इथल्या एका हॉटेलमध्ये तरुणाने आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीने नैराश्यातून स्वत:ला गोळी घालून जीवन संपवलं आहे. हॉटेलच्या खोलीमध्ये रक्ताचा थोराळ्यात या व्यक्तीचा मृतदेह पडला आहे. या व्यक्तीने आपल्या कपाळाच्या मधोमध गोळी मारली होती. तर त्याचे वय हे साधारण 35 ते 40 वयोगटातील असेल असा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलिसानी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, तपासात असं समोर आलं आहे की, हा तरुण कोरेगावात कामाला होता. तिथल्या एका राष्ट्रीयीकृत बँकेत कंत्राटी पद्धतीने कामावर होता. ही घटना खराडीतील तुळजाभवानीनगरातील हॉटेलमध्ये घडली आहे. या हॉटेलमध्ये तो तरुण 27 ऑक्टोबरला मुकामासाठी आला होता. या हॉटेलच्या तिसऱ्या माळ्यावर त्याला एक रूम मिळाली होती.
हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, 29 ऑक्टोबरला तो दुपार झाली तरी बाहेर आला नव्हता. हॉटेलमधील स्टॉफने अनेक वेळा त्याच्या रुमचा दरवाजा वाजवला होता. पण आतू काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हॉटेल स्टॉफला संशय आला आणि त्यांनी पोलिसांनी याबद्दल माहिती दिली. पोलिसांनाही माहिती मिळताच हेही तातडीने या हॉटेलमध्ये आलेत. त्यानंतर त्यांनी या रुमचा दरवाजा वाजवला. तर कोणीही काही प्रतिसाद देत नाही हे पाहून हॉटेल मॅनेजरला दुसऱ्या चाबीने दरवाजा उघडण्यास सांगितले. तेव्हा हा तरुण खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्या तरुणाचा हातात बंदूक होती आणि त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली होती.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्या सामानाची झाडाझडती घेतली आणि कुटुंबियांशी संपर्क केला. त्यानंतर या हॉटेलमध्ये त्याचे वडील आणि भाऊ पोहोचले. त्यांनी या मृतदेहाची ओळख पटवून दिली. कुटुंबियांनी सांगितलं तो अविवाहित होता. त्याचे लग्न ठरत नव्हतं त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तो प्रचंड नैराश्यात होता. कुटुंबाच्या या माहितीवरून त्याने याच कारणाने आपलं जीवन संपवलं असेल असा संशय पोलिसांना आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तर धक्कादायक गोष्ट म्हणजे आत्महत्या करण्यासाठी या तरुणाकडे पिस्तूल कुठून आली याचा तपास पोलीस युद्धपातळीवर करत आहेत.