SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुढच्या वर्षी हापूस आंबाच नाही? शेतकऱ्यांसमोर मोठं संकट, आंब्याचा मोहोरच...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा उत्पादनाची चिंता जाणवू लागली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 09, 2026, 01:11 PM IST | Updated: Oct 09, 2026, 01:13 PM IST
Image Credit: El Niño damages Alphonso mango production
Join

एल निनो आणि त्याचा हवामानावर होत असलेला परिणाम ही चिंतेची स्थिती आहे. एल निनोच्या प्रभावामुळं हवामानात बदल होताना दिसत आहे. महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट गडद होतेय. धरणातील जल साठ्यांवरही परिणाम होतोय. पाणी कमी तर त्याचा फटका पिकांवरही होताना दिसतोय. फळांचा राजा आंबावर एल निनो आणि बदललेल्या वातावरणाचा परिणाम होतोय.

कोकणातील हापूस आंबा हा सातासमुद्रापार पोहोचवला जातो. खवय्य्यांचा जीव की प्राण असणाऱ्या हापूस आंब्याचे उत्पादन यंदा घटणार का? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याला कारणही तसेच आहे. कोकणातील हापूस आंब्यावर देखील यंदा अनिश्चिततेचं सावट आहे. एल निनोचा परिणाम मे महिन्यापर्यंत जाणवणार असून आत्तापासूनच आंबा हंगामावर त्याचा परिणाम होताना दिसतोय.

भारतमध्ये आंब्याच्या झाडाला प्रामुख्याने डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मोहोर फुटतो. प्रामुख्याने थंडीचे हवामान मोहोर फुटण्यास पोषक असतो. आंब्याच्या झाडाला मोहराच्या प्रक्रियेऐवजी नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या वेळचा हंगाम लांबण्याची आंबा बागायतदारांना भिती आहे.

हापूसचा हंगाम नेमका कधी सुरू होणार? यंदा उत्पादन किती असणार? मोहर प्रक्रिया नेमकी कधी सुरू होईल? बाजारात हापूस दाखल झाल्यावर दर काय असतील? याबाबत काहीही ठोस सांगता येत नसल्याचं सध्याचं चित्र आहे. एल निनोचा प्रभाव आणि पावसानं दिलेली ओढ यामुळे हापुस हंगामाच्या सुरुवातीलाच सर्व गणित बिघडली असल्याचे बागायतदारांनी म्हटलं आहे. आंबा किंवा त्यापासून तयार होणारे इतर उत्पादने याला देखील फटका बसणार असल्याचे  म्हटलं जात आहे.

तापमानाचा पारा चढला

रत्नागिरी जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. चिपळूणमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. पावसाअभावी आधीच संकटात असलेल्या भातशेतीवर आता वाढत्या उष्णतेचा फटका बसत आहे. आंबा आणि काजू पिकांवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून संपूर्ण कोकण सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES