SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

धक्कादायक! भिवंडीत शोरमा खाल्ल्याने पुन्हा विषबाधा, 16 ते 17 जण रुग्णालयात दाखल; लहान मुलं आणि गर्भवती महिलेचा समावेश

2 महिन्यांपूर्वीही 107 जणांना विषबाधा झाली होती तरीही पुन्हा अशी घटना घडल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 24, 2026, 19:33 IST | Updated: Nov 24, 2026, 19:46 IST
Image Credit: भिवंडीत शोरमा खाल्ल्याने पुन्हा विषबाधा
Join

भिवंडीत शोरम्या्तून विषबाधा झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. बंजार पट्टी नाका येथील दुकानातून पिझ्झा आणि शोरमा खाल्ल्यानंतर जवळपास 18 ते 20 जणांना विषबाधा झाली आहे. 16 ते 17 जणांना स्वर्गीय इंदिरा गांधी मेमोरियल म्हणजेच IGM सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये लहान मुलं आणि एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. 2 महिन्यांपूर्वीही भिवंडीत 107 जणांना विषबाधा झाली होती, तरीही पुन्हा तीच घटना घडल्याने पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे

सोमवारी रात्री बंजार पट्टी नाका, वॉर्ड क्रमांक 1 येथील बहारे मशीद जवळील AK नावाच्या शोरम्याच्या दुकानातून पिझ्झा आणि शोरमा खाल्ला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच त्यांना सतत उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. सुरुवातीला 8 जण दाखल झाले होते, मात्र आता हा आकडा वाढून 16 ते 17 वर पोहोचला आहे. आजारी असलेल्यांमध्ये 4 महिला, 2 पुरुष आणि 2 मुलांचा समावेश असून एक महिला गर्भवती आहे

माहिती घेतली असता, म्हाडा कॉलनी आणि वंजारवाडी परिसरातील एकाच घरातील लहान मुलं आणि कुटुंबातील लोकांनी शोरमा खाल्ला असल्याचं समोर आलं आहे. रुग्णांची संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मागच्या वेळेसही आधी 20-25 जण दाखल झाले होते, नंतर तो आकडा 107 वर पोहोचला होता

फूड पॉयझनिंगच्या तक्रारीसह आतापर्यंत 16 ते 17 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णांना उलटी आणि जुलाबाची जास्त तक्रार आहे, मात्र सर्वांचा रक्तदाब सध्या स्थिर आहे. रुग्णांना बरे होण्यासाठी एक ते दोन दिवसांचा वेळ लागू शकतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दुपारी 4 वाजता विषबाधा झाल्याची घटना समजताच महापालिकेचे अधिकारी आणि अतिक्रमण विभागाचे निरीक्षक घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलीस खात्याकडून पंचनामा करण्याची कारवाई सुरू आहे. अन्न व औषध विभागाचे निरीक्षकही तासाभरात घटनास्थळी येऊन कारवाई करणार आहेत. ज्या दुकानातून शोरमा खाल्ला, त्या दुकानावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे

आज आम्हाला दुपारी 4 वाजता वंजारपट्टी नाका, वॉर्ड क्रमांक 1, बहारे मशीद येथे विषबाधा झाल्याची घटना समजली. घटनेच्या ठिकाणी मी आणि माझे निरीक्षक उपस्थित होतो. सध्या आम्ही इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये आहे. तिकडे 16 ते 17 जणांना विषबाधा झाल्याचे समजले. तिकडे पोलीस खात्याकडून पंचनामा करण्याची कारवाई चालू आहे. आणि ज्या ठिकाणचा शोरमा खाल्लाय, तिकडे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याच्यापूर्वी 2 महिन्यांपूर्वी 107 जणांना विषबाधा झाली होती. त्यावेळेस पण महानगरपालिकेने प्रत्येक प्रभाग समितीने कारवाई केली होती. आता जे चालू आहे त्याच्यावर नियमानुसार पुढची कारवाई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.


2 महिन्यांपूर्वी 107 जणांना विषबाधा झाल्यानंतरही महापालिकेने कारवाई केली होती, तरीही पुन्हा एकदा शोरम्यातू विषबाधेची घटना घडली आहे. त्यामुळे अनधिकृतपणे सुरू असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांवर महापालिका ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई करणार का, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES