SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बेरोजगार तरुणांना दरमहा 2000 रुपये! पदवीधरांसाठी सरकारची नवी योजना; कोणाला किती पैसे मिळणार?

पश्चिम बंगालमध्ये बेरोजगार पदवीधरांना दरमहा 2000 रुपये, तर इतर पात्र तरुणांना 1500 रुपये मिळणार. भरोसा योजनेची पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 24, 2026, 19:05 IST | Updated: Nov 24, 2026, 19:18 IST
Image Credit: बेरोजगारांसाठी योजना
Join

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आर्थिक आधार देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने बेरोजगार भत्ता योजनेत बदल करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर याबाबत माहिती दिली. नव्या ‘भरोसा कर्मसूची’अंतर्गत पात्र पदवीधर आणि काही तांत्रिक शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना दरमहा 2000रुपये, तर पदवी पूर्ण न केलेल्या पात्र तरुणांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. जानेवारी 2027 पासून ही आर्थिक मदत सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेसह कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागणार? सविस्तर जाणून घेऊया.

कोणाला किती रुपये?

पश्चिम बंगाल सरकारच्या घोषणेनुसार, बेरोजगार पदवीधरांना दरमहा 2000 रुपये मिळतील. सरकारी मान्यताप्राप्त व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील डिप्लोमा धारक आणि आयटीआय (ITI) शिक्षण घेतलेल्या पात्र तरुणांचाही या गटात समावेश आहे. पदवी पूर्ण न केलेल्या पात्र बेरोजगार तरुणांना दरमहा 1500 रुपये दिले जातील. ही मदत नोकरी मिळेपर्यंतच्या काळात तरुणांना आर्थिक आधार देण्यासाठी असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

21 ते 45 वर्षे वयोगटातील तरुणांना संधी

या योजनेसाठी अर्जदाराचे वय 21 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. मात्र, केवळ वयाची अट पूर्ण केल्याने लाभ मिळणार नाही. अर्जदार बेरोजगार असणे आणि संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण करणेही आवश्यक आहे. योजनेच्या पात्रतेबाबतचे अंतिम निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची सविस्तर प्रक्रिया सरकारच्या अधिकृत नोटिफिकेशनद्वारे दिली जाणार आहे.

2028--29 पासून भत्त्यात वाढ

सध्या जाहीर केलेल्या दरानुसार पदवीधरांना 2000 रुपये आणि पदवी नसलेल्या पात्र तरुणांना 1500 रुपये मिळतील. मात्र, 2028-29 या आर्थिक वर्षापासून या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. त्यानुसार पदवीधरांसाठी भत्ता 3000 रुपये, तर पदवी नसलेल्या पात्र तरुणांसाठी 2000 रुपये करण्याचे नियोजन आहे. ही वाढ भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनानुसार असल्याचे मुख्यमंत्री अधिकारी यांनी सांगितले.

अर्ज कुठे करायचा? पैसे कधी मिळणार?

‘आपनार सरकार, आपनार पाशे’ या सरकारी उपक्रमाच्या माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्राप्त अर्ज युवक कल्याण विभागाकडे पडताळणीसाठी पाठवले जातील. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात थेट पैसे जमा करण्याचे नियोजन आहे. जानेवारीपासून प्रक्रिया सुरू होणार असली, तरी योजनेचा औपचारिक शुभारंभ फेब्रुवारीमध्ये कार्यक्रमाद्वारे केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एका कुटुंबातील दोनच लाभार्थी

एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन व्यक्तींनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरमहा 3000 रुपये मिळणाऱ्या व्यक्तींना या नव्या भत्त्यासाठी पात्र ठरवले जाणार नसल्याचे वृत्त आहे. यापूर्वीच्या योजनेतील सुमारे 54 लाख लाभार्थ्यांची पडताळणी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पात्रता आणि इतर सरकारी योजनांमधून मिळणाऱ्या लाभांबाबतच्या अटी तपासणे आवश्यक आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES