डेंजर बातमी! तरुणाच्या पार्श्वभागातून डॉक्टरांनी बाहेर काढला 4 फूट लांबीचा शॉवर पाईप
गंभीर अवस्थेत असलेल्या या तरुणाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांच्या अंत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून हा पाईप शरीरातून बाहेर काढला. मात्र हा एवढा लांब पाईप तरुणाच्या शरीरात गेला कसा?
मेडिकल क्षेत्रामध्ये काही विचित्र प्रकरणांमुळे स्वत: डॉक्टरही हादरून जातात. असाच काहीसा प्रकार नुकताच राजस्थानमध्ये समोर आला आहे. राजस्थानमधील जोधपूर येथील मथुरादास माथूर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांनाही विश्वास बसणार नाही अशी शस्रक्रिया केली आहे. येथील डॉक्टरांनी एका तरुणाच्या गुदद्वारातून (मलद्वारातून) सुमारे चार फूट लांब बाथरूम शॉवर पाईप शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या बाहेर काढला आहे. आता या तरुणाच्या शरीरामध्ये हा पाईप गेला कसा असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. मात्र हा पाईप या तरुणाच्या शरीरामध्ये बळजबरीने घुसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नेमका हा पाईप शरीरात गेला कसा?
मिळालेल्या माहितीनुसार, शस्रक्रिया करुन जीव वाचवण्यात आलेल्या तरुणाचा बाथरूम वापरण्यावरून काही तरुणांशी वाद झाला. या तरुणांच्या टोळक्याने एकट्या असलेल्या पीडित तरुणावर हल्ला केला. या तरुणांनी त्याच्या गुदद्वारात हा चार फूट लांब पाईप घुसवला.
जीवाला धोका
हा शॉवर पाईप तरुणाच्या मोठ्या आतड्याला चिरून थेट पोटाच्या पोकळीपर्यंत (अॅब्डोमनपर्यंत) पोहोचला होता. अंतर्गत अवयवांना इजा झाल्यामुळे या तरुणाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. उपचारांसाठी या तरुणाला 12 नोव्हेंबर रोजी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. 13 नोव्हेंबर रोजी जनरल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. दिनेश दत्त शर्मा यांच्या नेतृत्वाखालील टीमने सुमारे साडेतीन तास चाललेली अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून शरीराच्या आतील भागात जखमा झालेल्या अवयवांच्या जवळच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्या आणि इतर अवयवांना इजा न होऊ देता हा पाईप बाहेर काढला आणि आतड्याची दुरुस्ती केली.
अशी प्रकरण फारच धोकादायक कारण...
शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने पीडित रुग्णाच्या आतड्याला एक छिद्रं पाडलं. या प्रक्रियेला 'एन्टेरोटॉमी' असे म्हणतात. पोटाच्या भागातून शॉवर पाईप बाहेर काढण्यासाठी याचा फायदा झाला. अशा प्रकारच्या गोष्टी शरीरामध्ये घुसणं आणि जितक्या हिंसक पद्धतीने हा सारा प्रकार घडला ते पाहता सदर प्रकरण मेडिकल टर्ममध्येही फारच घातक पद्धतीचं होतं. अशा प्रकरणामध्ये आधीच इजा झालेल्या अवयवांना अधिक नुकसान न पोहोचवता ही वस्तू बाहेर काढण्याचं आव्हान डॉक्टरांसमोर असतं. डॉ. दिनेश दत्त शर्मा आणि त्यांच्या टीमने हे आव्हान यशस्वीरित्या पेललं.
सर्व श्रेय डॉक्टरांना
रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. रुग्णालयाने गंभीर जखमी झालेल्या या तरुणीला जीवनदान मिळाल्याचं श्रेय तज्ज्ञ डॉक्टरांच्या आणि संपूर्ण टीमने एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांना दिले आहे.
मोफत उपचार केले
राजस्थान सरकारच्या 'मुख्यमंत्री आयुष्मान आरोग्य योजनेअंतर्गत' ही संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.