SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शाळेत विद्यार्थिनीवर करवतीने हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घातल्या गोळ्या, म्हणाले 'त्याने...'

आरोपी हेमंत ऊर्फ डमु याला पोलिसांच्या एका विशेष पथकाने जिल्ह्यातील आत्मकूर वनक्षेत्रातून संध्याकाळच्या सुमारास ताब्यात घेतले होते.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 02, 2026, 07:37 AM IST | Updated: Nov 02, 2026, 07:56 AM IST
Image Credit: शाळेत विद्यार्थिनीवर करवतीने हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घातल्या गोळ्या
Join

शाळेतील विद्यार्थिनीवर करवतीने हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गोळ्या घातल्या आहेत. 21 वर्षीय आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने त्याला गोळ्या घालण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आंध्र प्रदेशात ही घटना घडली आहे. अनंतपूर जिल्ह्यातील रापथाडू येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या 10 वीच्या 15 वर्षीय विद्यार्थिनीवर आरोपीने यांत्रिक करतवीने  हल्ला केला होता. पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रविवारी रात्री पोलिसांच्या गोळीबारात तो जखमी झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अनंतपूर पोलीस मुख्यालयातील एका अधिकाऱ्याने 'एचटी'ला (HT) सांगितले की, हेमंत ऊर्फ 'डुम्मु' असे असे या आरोपीचे नाव आहे. त्याला रविवारी संध्याकाळी आत्मकूर वनक्षेत्रातून एका विशेष पोलीस पथकाने अटक केली होती. गुन्ह्याच्या ठिकाणी नेमकी घटना कशी घडली याचे रुपांतर करण्यासाठी त्याला नेले जात असताना, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली.

“जेव्हा पोलीस त्याला शाळेत घडलेल्या गुन्ह्याच्या घटनेचे रुपांतर करण्यासाठी रापताडू येथे घेऊन जात होते, तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना या हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

त्यानंतर, त्याला पळून जाण्यापासून रोखण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी स्वसंरक्षणास्तव गोळीबार केला. “पोलिसांनी त्याच्या दिशेने सहा राऊंड गोळ्या झाडल्या, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये हेमंतला अर्धवट शुद्ध हरपलेल्या अवस्थेत रुग्णालयात नेले जात असल्याचे दिसत आहे.

नेमकं घडलं कायं?

ही घटना शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. हेमंत नावाच्या व्यक्तीने शाळेच्या आवारात प्रवेश करून एका विद्यार्थिनीवर यांत्रिक करवतीने हल्ला केला. तिला वाचवण्याचा प्रयत्न करणारी दुसरी एक विद्यार्थिनीही या हल्ल्यात जखमी झाली. मुख्य पीडित विद्यार्थिनीला सुरुवातीला अनंतपूर सरकारी रुग्णालयात  नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी सुमारे आठ तास प्रयत्न करून तिची प्रकृती स्थिर केली.

रुग्णालयातील एका डॉक्टरांनी पत्रकारांना सांगितले की, मुलीच्या उजव्या हातावर खांद्याजवळ खोल जखम झाली होती, ज्यामुळे सांधा उघडा पडला होता. तसेच, तिच्या चेहऱ्यावरही गंभीर जखमा झाल्या होत्या. तिला अनेक शस्त्रक्रियांची गरज होती, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तिला बेंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी सुमारे 12 तास चाललेली शस्त्रक्रिया पूर्ण केली आणि त्यानंतर तिला अतिदक्षता विभागात (ICU) हलवले, अशी माहिती लोकेश यांनी दिली.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES