गेल्या वर्षभरात अनेक प्रसिद्ध कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीकपात करण्यात आली आहे. अचानक एका मेल होतो आणि असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दिवाळीच्या तोंडावरही दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी कपात करण्यात आली आहे. AI सेवा कंपनी Innodata ने तब्बल 550 भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. तर Amazon ने 250 जणांना अचानक एक मेल पाठवून कामावर येऊ नका असं सांगितलं. अशात सोशल मीडियावर एका इंजिनिअर तरुणाची पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यात त्याने लिहिलं की, Microsoft कंपनी तिला नोकरीसाठी ₹11 लाखांची ऑफर देत आहे.
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, मायक्रोसॉफ्टने आपल्या 60000 कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती किंवा रजेचा पर्याय दिल्यामुळे एकच खळबळ माजली होती. या हैदराबादमधील एका 23 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्याने सांगितलं की, कंपनीने तिला नोकरी सोडण्यासाठी 11 लाखांची ऑफर दिली. त्यामुळे आता त्याला समजत नाहीय की, 11 लाख घेऊन नोकरी सोडू की कंपनीत राहून काम करू. त्याची ही द्विधा मनस्थितीबद्दल त्याने रेडिटवर मांडली आहे. यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

या तरुणाने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील r/hyderabad कम्युनिटीवर एक पोस्ट शेअर केल्यानंतर तो सध्या चर्चेत आला आहे. मायक्रोसॉफ्टची 'व्हॉलंटरी एक्झिट ऑफर' नावाखाली 60000 कर्मचाऱ्यांना ऑफर दिली की, तीन महिन्यांचा पूर्ण पगार घ्या आणि नोकरी सोडा. त्याला यानुसार 11 लाख मिळणार आहे. त्याने सोशल मीडियावर प्रश्न विचारला की, मी ही ऑफर स्वीकारावी का?
या तरुणाच्या पोस्टनंतर युजर्सकडून तुफान प्रतिसाद मिळतोय. प्रत्येक जण आपली मतं मांडत आहेत. खरं तर यावर तीन वेगवेगळा प्रतिक्रिया आल्या आहेत. पहिली प्रतिक्रिया म्हणजे हा खूप कठीण निर्णय आहे. तर काही यूजर्सने म्हटलं की, सध्या नोकरी मिळणं कठीण आहे, त्यामुळे अशा स्थितीत चांगल्या कंपनीतील नोकरी सोडू नका. तर तिसरा पर्याय की, पैसे घे आणि नोकरी सोड आणि नवीन नोकरी शोध. यजूर्सने तीन पर्याय दिल्यामुळे आता या तरुण काय निर्णय माहिती नाही. पण त्यांनी त्याची मनस्थितीबद्दल सोशल मीडियावर शेअर केली. यातून त्याचा गोंधळ कमी झाला की वाढला हे त्यालाच माहिती.
स्वैच्छिक निर्गमन प्रस्ताव योजना म्हणजे ऐच्छिक राजीनामा असं आहे. या घोषणा मायक्रोसॉफ्ट कंपनीने 26 ऑक्टोबरला केली होती. या बातमीनंतर जगात खळबळ माजली. यात 23000 भारतीयांना ऑफर देण्यात आली.