SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

माणुसकीला काळिमा फासणारी घटना बेळगावमध्ये घडली आहे. नातवानेच आजीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 20, 2026, 14:49 IST | Updated: Nov 20, 2026, 14:53 IST
Image Credit: belgaum crime news grandchild killed grandmother for gruha laxmi yojna
Join

आजीने लहानाचे मोठे केले, प्रेमाने सांभाळले, त्याच आजीचा जीव घेण्याइतका पैशांचा हव्यास एका नातवाला झाला. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील अरळीकट्टी गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

गृहलक्ष्मी योजनेतून मिळणाऱ्या पैशांमध्ये हिस्सा देण्यास आजीने नकार दिल्याच्या रागातून 20 वर्षीय नातवाने 78 वर्षीय आजीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर मृतदेह दोन गोण्यांमध्ये भरून, त्याला दगड बांधत जलाशयात फेकून दिले. या प्रकरणात आरोपीला मदत केल्याच्या आरोपावरून त्याच्या वडिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

हम्मन्ना बालप्पा सनदी (वय 78) या 10 नोव्हेंबर रोजी पाश्चापूर येथील आठवडी बाजारात जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. नातेवाईक आणि परिचितांकडे चौकशी करूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर 15 नोव्हेंबर रोजी जीनराळ गावाजवळील घटप्रभा नदीच्या धरणाच्या पाणीसाठ्यात दोन गोण्यांमध्ये भरलेला मृतदेह आढळून आला. या गोण्यांना मोठमोठे दगड बांधण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तपास सुरू केला आणि तपासाची चक्रे फिरताच धक्कादायक वास्तव समोर आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा 20 वर्षीय नातू भीमप्पा रामप्पा सनदी यानेच आजीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आजीला गृहलक्ष्मी योजनेतून मिळणाऱ्या पैशांमध्ये आपल्यालाही हिस्सा मिळावा, अशी मागणी तो गेल्या काही वर्षांपासून करत होता.

याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
10 नोव्हेंबर रोजी भीमप्पा आजीला दुचाकीवरून गवी सिद्धेश्वर डोंगरावर घेऊन गेला. तेथे पुन्हा पैशांवरून वाद झाला. आजीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या नातवाने तिला खाली ढकलले. त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर गुन्हा लपविण्यासाठी आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला.

मृतदेह डोंगरावर सोडून तो पाश्चापूर येथे गेला आणि दोन गोण्या घेऊन परतला. आजीजवळील 2300 रुपये काढून घेतले. तसेच तिच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्याही काढून घेतल्या. त्यानंतर मृतदेह गोण्यांमध्ये भरून रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जीनराळ गावाजवळील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये नेला.

गोण्यांमध्ये मोठे दगड भरून त्या पाण्यात फेकून दिल्या, जेणेकरून मृतदेह पाण्यातच राहील आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट होईल. दरम्यान पोलिसांनी तपासादरम्यान नातवाची चौकशी केली असता हत्येचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. आरोपीला गुन्ह्यानंतर मदत करून त्याची बाजू लपविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्याच्या वडिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मृत महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एकीकडे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गृहलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जात असताना, त्याच पैशांच्या हव्यासातून एका नातवाने स्वतःच्या आजीची हत्या केल्याची ही घटना धक्कादायक आहे. ज्या आजीने आयुष्यभर नातवाला प्रेमाने जपले, त्याच आजीचा जीव पैशांसाठी घेण्यात आला. या अमानुष घटनेने बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES