SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुंबईत IBPS मध्ये नोकरीची मोठी संधी अन् 14 लाखांचं पॅकेज; कुठे करायचा अर्ज?

IBPS मुंबई भरती २०२६ अंतर्गत सर्व्हर अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, असिस्टंट आणि प्रोग्रामिंग असिस्टंट पदांसाठी अर्ज सुरू. पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया आणि अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 31, 2026, 06:42 PM IST | Updated: Oct 31, 2026, 06:52 PM IST
Image Credit: आयबीपीएस नोकरी
Join

मुंबईत नियमित नोकरीच्या शोधात असलेल्या आणि आयटी, कॉम्प्युटर तसेच डेटा व्यवस्थापन क्षेत्रात अनुभव असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने मुंबईतील कार्यालयासाठी सर्व्हर अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, असिस्टंट आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या पदांवर थेट भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पदांचा तपशील, अर्ज करण्याची अंतिम तारीख याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

कोणत्या पदांसाठी भरती?

IBPS च्या जाहिरात क्रमांक IBPS/2026-27/06 अंतर्गत तीन पदांचा समावेश आहे.सर्व्हर अ‍ॅडमिनिस्ट्रेटर – ग्रेड D,असिस्टंट – ग्रेड B आणि  प्रोग्रामिंग असिस्टंट – ग्रेड B ही पदे भरली जाणार आहेत.ही नियमित स्वरूपातील थेट भरती आहे. मात्र, जाहिरातीत पदांची एकूण निश्चित संख्या नमूद केलेली नाही. निवड झालेल्यांची नियुक्ती उपलब्ध रिक्त पदांनुसार केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

सर्व्हर अ‍ॅडमिनिस्ट्रेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटीमधील बीई किंवा बीटेक पदवी आणि किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक. लिनक्स सर्व्हर प्रशासन आणि नेटवर्क मॅनेजमेंटचे ज्ञान अपेक्षित आहे. यासाठी उमेदवाराचे वय 25 ते 33 वर्षांदरम्यान असावे.

असिस्टंटया पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी आणि एमएस एक्सेलचे प्रगत ज्ञान आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव हवा. तसेच वय 23 ते 30 वर्षांदरम्यान असावे.

प्रोग्रामिंग असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बीएससी आयटी, बीसीए, बीएससी कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्स/आयटीमधील इंजिनिअरिंग पदवी आवश्यक. दोन वर्षांचा अनुभव आणि युनिक्स/लिनक्सचे ज्ञान हवे. वय 23 ते 30 वर्षांदरम्यान असावे.वयोमर्यादा 1 ऑक्टोबर 2026 रोजी मोजली जाणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पगार किती मिळणार?

या भरतीतील वेतनाचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत. सर्व्हर अ‍ॅडमिनिस्ट्रेटर : वार्षिक CTC अंदाजे ₹14.9 लाख, असिस्टंट पदासाठी वार्षिक सीटीसी अंदाजे ₹10.57 लाख, प्रोग्रामिंग असिस्टंट पदासाठी वार्षिक CTC अंदाजे ₹10.57 लाख इतका पगार दिला जाणार आहे. सीटीसीमध्ये विविध भत्ते आणि कर्मचारी लाभांचा समावेश आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड अर्जांची छाननी, कागदपत्र पडताळणी, ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे होणार आहे. परीक्षा 100 गुणांची असून कालावधी 90 मिनिटे आहे. चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची कपात होईल. मुंबईत राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. निवड झाल्यानंतर एक वर्षाचा प्रोबेशन कालावधी आणि दोन वर्षांची सेवा देण्याचा ₹1 लाखांचा बाँड लागू असेल. IBPS कडून निवासाची सुविधा मिळणार नाही.

अर्ज कसा आणि कुठे करायचा?

इच्छुक उमेदवारांनी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटला https://www.ibps.in भेट देऊन करियर्स विभागातील संबंधित भरतीची जाहिरात पाहावी. ऑनलाइन नोंदणी 29 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून 12 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी अर्ज शुल्क ₹250 आहे. फोटो, सही, डाव्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र, बायोडेटा आणि शैक्षणिक व अनुभवाची कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्जाची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2026 असून यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES