SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गंगा नदीत मोठी दुर्घटना; बोट उलटून 11 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीत बोट उलटल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 13, 2026, 11:15 PM IST | Updated: Oct 13, 2026, 11:21 PM IST
Join

बिहार : बिहारच्या हाजीपुरात मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीत बोट उलटली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीतून 15 ते 20 लोक प्रवास करत होते. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

13 ऑक्टोबर रोजी बिहारमधील हाजीपूर येथे गंगा नदीत एक बोट उलटून मोठा अपघात झाला. बोटीत जवळपास 20  हून लोक होते. हा अपघात राघोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर श्यामचंद गावाजवळ घडला. वैशालीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या अपघातात 11 जणांच्या मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 

नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहिती नुसार ही बोट एका मेजवानीसाठी जात होती. काही अंतरावर गेल्यावर गंगा नदीत ही बोट उलटली. सर्वा प्रावसी नदीत बुडू लागले. अनेका पोहता येत नव्हते. घटनेची माहिती मिळताच परिसरात घबराट पसरली. स्थानिक पोलीस आणि प्रशासन तात्काळ घटनास्थळ दाखल झाले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. 5 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 

पोलिस मृतदेहांची ओळख पटवून  मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.  घटनास्थळाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दुर्घटनेनंतर घटनास्थळी आरडा, ओरडा आणि प्रचंड गोंधळ पहायला मिळत आहे. रात्रीची वेळ असल्याने बचाव कार्यात देखील अडथळा येत होता.  अपघातानंतर पीडितांना मदत करण्यासाठी स्थानिकांची गर्दी जमली होती.  या भीषण दुर्घटनेत, लोक आपल्या प्रियजनांबद्दल माहिती मिळवण्यासाठी धडपडत होते. 

गंगा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खाजगी बोटींच्या संचालनावर संपूर्ण बंदी घातली होती. असे असूनही, खाजगी बोटी नियमांचे उल्लंघन करून चालवल्या जात होत्या. अपघातानंतर स्थानिक प्रशासनाच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने बोटींच्या वाहतुकीवर बंदी घातली असतानाही, ही अवैध वाहतूक कशी सुरू होती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES