SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

देशातील सर्वात मोठा पॅकेज्ड वॉटर ब्रँड बिस्लेरीच्या टेस्टचा हादरवणारा रिपोर्ट, कॅन्सरचे घटक...काय म्हणाले FSSAI?

देशातील सर्वात मोठा पॅकेज्ड वॉटर ब्रँड असलेल्या बिस्लेरीची दोन वेळा टेस्ट झाली आणि त्या दोन्ही टेस्टमध्ये नकारात्मक रिपोर्ट आला. बिस्लेरी हे पिण्यायोग्य नाही असं आढळून आलं आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 23, 2026, 08:33 IST | Updated: Nov 23, 2026, 08:43 IST
Image Credit: Bisleri packaged drinking water
Join

धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील असंख्य लोक ज्या पॅकेज्ड वॉटर ब्रँड डोळे झाकून विश्वास ठेवतात ते पाणी पिण्यायोग्य नाही, असं एफएसएसएआयने सांगितलं. हो बरोबर, देशातील सर्वात मोठी पाणी कंपनी असलेल्या बिस्लेरीचे पाणी दोन चाचणीत फेल झाले आहेत. त्यामुळे एफएसएसएआयने बिस्लेरी कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षेसाठी जबाबदार असलेली सरकारी संस्था, एफएसएसएआयने (FSSAI), बिस्लेरीच्या पाण्याच्या नमुन्यांची दोन चाचण्या केली. ज्याचा रिपोर्ट हा अतिशय धक्कादायक आला आहे. या रिपोर्टनंतर  एफएसएसएआयने कंपनीवर न्यायालयात केस दाखल केली आहे. बिस्लेरीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आलं आहे.

बिस्लेरीच्या टेस्टचा हादरवणारा रिपोर्ट

एफएसएसएआयने (FSSAI) सांगितलं की, पहिल्या चाचणीत पाण्यातील ब्रोमेटची पातळी परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळली. ब्रोमेटची पातळी जास्त असणे आरोग्यासाठी धोकादायक मानली जाते. कंपनीने यावर आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा टेस्ट करण्यात आली. पण त्यातही पाणी असुरक्षित असल्याचे समोर आलं. यावेळी, पीएएच (PAHs) नावाचे कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटकही आढळल्यामुळे एकच खळबळ माजली. विशेष म्हणजे, पाण्याचे नमुने बाजारातून नव्हे, तर बिस्लेरी कंपनीच्या आवारातून गोळा केल्यानंतर हा अहवाल आला आहे.

 

 

तर दुसरीकडे FSSAI कडून आणखी एक मोठी कारवाई केली गेली आहे. FSSAI ने उर्मी लाईफ सायन्सेस एलएलपी आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर या दोन उत्पादनांचे परवाने रद्द केले आहेत. तसंच वसंत मसाला, टीआयटी-बीआयटी फुडस इंडिया, मिमान्सा इंडस्ट्रीज आणि आशा Confectionery या कंपन्यांविरोधातही कोर्टात केस दाखल करण्यात आले आहेत.   

  

तर ऑक्टोबर 2026 च्या अखेरीस सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ झाली होती. ज्यामध्ये बिस्लेरीच्या बाटल्यांमध्ये नाल्याचे किंवा अस्वच्छ पाणी फिल्टर करून भरले जात असल्याचा दावा या व्हिडीओमधून करण्यात आला होता. तेव्हा कंपनीने संबंधित जागा बिस्लरीचा प्लांट नसल्याचे स्पष्ट झालं होतं. तेव्हादेखील बिस्लेरीच्या पाण्याबाबत शंका उपस्थित झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES