SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भाजप माजी खासदाराचं निधन, अनुभवी चेहरा हरपल्यामुळे राजकीय वर्तुळात शोककळा

माजी आमदार आणि माजी राज्यसभा खासदार असलेल्या नारायण सिंग केसरी यांचं निधन झालं आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 22, 2026, 20:18 IST | Updated: Nov 22, 2026, 20:24 IST
Image Credit: narayan singh kesari
Join

भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार नारायण सिंह केसरी यांचं वयाच्या 92 वर्षी निधन झालं आहे. नारायण सिंह केशरी हे मध्य प्रदेशातील भाजपचे वरिष्ठ अनुभवी नेते होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरलीय. जनसंघाच्या काळापासून ते राजकारणात सक्रिय होते. ते माजी आमदारहीदेखील होते. स्पष्ट आणि प्रभावी वक्ते म्हणून त्यांनी राजकारणात आपली ओळख निर्माण केली.

नारायण सिंह केसरी यांनी जनसंघ काळापासून संघटनेसाठी काम केलंय. तसंच भाजपच्या स्थापनेनंतरही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.  त्यांच्या राजकीय कारकिर्दीत संघटनात्मक कार्य आणि जनसंपर्काने महत्त्वाची भूमिका बजावली. विनोद तावडे यांनी शोकसंदेश पोस्ट केला आहे. 

भाजपच्या शोकसंदेशात म्हटलं की, केसरी यांनी अथक परिश्रम आणि वारंवार केलेल्या प्रवासातून, मध्य प्रदेशसह देशाच्या विविध भागांतील अनुसूचित जातींमध्ये संघटनेचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली . पक्षाच्या नेत्यांनी त्यांना संघर्ष, दृढनिश्चय आणि समर्पणाचे प्रतीक म्हणून संबोधले असून, त्यांचे निधन हे संघटनेचे मोठे नुकसान आहे.

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लाल सिंह आर्य यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे, "जनसंघ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, स्पष्ट आणि प्रभावी वक्ते, माजी आमदार आणि माजी राज्यसभा खासदार श्री नारायण सिंह केसरी यांच्या निधनाने आम्ही व्यथित झालो आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो."

 

 

 आपल्या अथक परिश्रमातून आणि प्रवासातून, त्यांनी मध्य प्रदेशसह देशभरातील अनुसूचित जातींमध्ये संघटनेचा विस्तार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने संघटनेने एक महान व्यक्तिमत्व गमावले आहे, असं त्यांनी लिहिलंय. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES