SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ...', अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा, 'आज रात्री किंवा सकाळी पोलीस मला उचलू शकतात'

अभिजीत दीपके यांनी दावा केला आहे की, दिल्ली पोलीस आणि गुप्तचर विभागाचे (IB) अधिकारी त्यांच्या आसपास घिरट्या घालत आहेत आणि त्यांना कोणत्याही क्षणी ताब्यात घेतले जाऊ शकते.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 16, 2026, 07:10 AM IST | Updated: Oct 16, 2026, 07:20 AM IST
Image Credit: अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा
Join

दिल्ली पोलीस आपल्याला कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतात असा दावा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. अभिजीत दिपके यांनी कनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये 'लेहरा दो तिरंगा' (तिरंगा फडकवा) या मोहिमेअंतर्गत आंदोलनाची घोषणा केली आहे. अभिजीत दीपके यांनी रात्री उशिरा आरोप केला की, दिल्ली पोलिसांचे कर्मचारी त्यांच्या आसपास फिरत आहेत. केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले, "तुम्ही दिल्लीला ठप्प केले आहे, इंटरनेट बंद केले आहे आणि जागोजागी बॅरिकेड्स लावले आहेत. उद्या जर 'कॉकरोच जनता पार्टी'ने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीत तिरंगा फडकवण्याची घोषणा केली, तर तुम्ही तुमची रॅली रद्द कराल का? सरळ येऊन सांगा ना की, तुम्ही तिरंगा फडकवू देणार नाही."

अभिजीत दीपके म्हणाले, "इंटेलिजन्स ब्युरो (IB) चे अधिकारी आणि दिल्ली पोलिसांचे कर्मचारी माझ्या आसपास फिरत आहेत. दिल्ली पोलीस मला आज रात्री किंवा उद्या सकाळी ताब्यात घेऊ शकतात. आम्ही केवळ जबाबदारी स्विकारण्याची मागणी करत आहोत. आमची मागणी आहे की, ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून दुसऱ्या कोणाची तरी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली जावी. जर ज्ञानेश कुमार सर्वोच्च न्यायालयाचेही ऐकत नसतील, तर ते नक्की कोणासाठी काम करत आहेत?"

सेंट्रल पार्क सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे बंद

नवी दिल्ली महानगरपालिकेने (NDMC) प्रशासकीय कारणास्तव कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क 16 आणि 17 ऑक्टोबर 2026 रोजी सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, दिल्ली पोलिसांनी या परिसरात 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) च्या कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना दीपके म्हणाले, "तुम्ही किती ठिकाणे बंद करणार आहात? जर आम्ही 1000 ठिकाणी तिरंगा फडकवण्याची घोषणा केली, तर तुम्ही ती सर्व ठिकाणे बंद कराल का? ही एक प्रकारे आणीबाणीच आहे. तुम्ही अधिकृतपणे आणीबाणी जाहीर करत नाही आहात, कारण तसे केल्यास तुमची प्रतिमा मलिन होईल."

 

 

सेंट्रल पार्कमधील आंदोलनावर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाचा नकार

यापूर्वी, दिल्ली उच्च न्यायालयाने अभिजीत दिपके यांना 16 ऑक्टोबर रोजी कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क मध्ये निदर्शने करण्यापासून रोखणारा आदेश देण्यास नकार दिला होता. मात्र, आंदोलकांच्या उपक्रमांचे नियमन आणि व्यवस्थापन करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन पोलिसांनी दिले असून न्यायालयाने त्याची दखल घेतली आहे.

 

 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, दिल्ली पोलिसांनी संबंधित परिसरात 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) च्या कलम 163 अंतर्गत आदेश लागू केले आहेत. पोलिसांनी सर्वसामान्य नागरिक आणि संभाव्य आंदोलकांना या जमावात सहभागी न होण्याचे आवाहन केले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची तयारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम आदमी पार्टी'ने (AAP) आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दिल्ली पोलिसांच्या डीसीपी नेहा यादव यांनी सांगितले की, कनॉट प्लेस आणि परिसरातील विविध व्यापारी संघटनांनी पोलिसांकडे निवेदने दिली आहेत. यामध्ये त्यांनी बेकायदेशीर जमावापासून संरक्षण करण्याची मागणी केली आहे. व्यापाऱ्यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की, अशा प्रकारच्या हालचालींमुळे त्यांच्या व्यवसायावर, विशेषतः सणासुदीच्या काळात, विपरीत परिणाम होऊ शकतो.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES