SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जीम ट्रेनरसोबत पत्नीचं अफेअर, पहाटे प्रियकराला घरी बोलवलं आणि पती झोपेत असतानाच...

पत्नीने पती झोपला असताना पहाटे प्रियकराला घरी बोलोवलं आणि मग धक्कादायक कृत्य केलं. गाझियाबादमधील वसुंधरामधील या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 28, 2026, 02:06 PM IST | Updated: Oct 28, 2026, 02:12 PM IST
Image Credit: ghaziabad crime
Join

गाझियाबाद जिल्ह्यातून विवाहबाह्य संबंधातून हत्येचा कट उघड झाला असून पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. नातेसंबंधाला तडा जाणाऱ्या या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गाझियाबादमधील वसुंधराच्या सेक्टर 1 मधील धक्कादायक घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहित महिला तिच्या जिम ट्रेनरच्या प्रेमात होती. त्यांच्या या अनैतिक संबंधात पती अडथळा होत असल्याने या दोघांनी काटा काढण्याचे ठरवलं.

पोलिसांनी सांगितलं की,  जागृती आरडब्ल्यूए सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. 26 ऑक्टोबरला पहाटे 5:15 ला पती घरात झोपले असताना त्या महिलेने आपल्या प्रियकराला घरी बोलावलं. पती शशांक कंथारिया यांच्यावर हल्ला करण्यात आला. घटनेच्या वेळी त्यांची पत्नी प्रिया शर्मा जीमसाठी घराबाहेर पडणार होती, तेव्हा हल्ला झाला. जीम ट्रेनर प्रताप सिंग याच वेळी घरात घुसला आणि त्याने शशांकवर अनेक वेळा चाकूने वार केले. या हल्ल्याच्या वेळी शशांक जोरदार ओरडू लागल्याने प्रताप तिथून पळाला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शशांकला यशोदा मेडिसिटी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी या हल्ल्येच्या तपास केल्यावर असं समोर आलं की, प्रताप सिंग हा फिटनेस हेडक्वार्टर्स जीममध्ये कोच होता. तर प्रिया शर्मा गेल्या 7-8 महिन्यांपासून या जीममध्ये जात होती. यादरम्यान या दोघांची ओळख झाली नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या दोघांना पोलिसांनी अटक केली. तेव्हा चौकशीदरम्यान समोर आलं की, या दोघांना लग्न करायचं होतं. शशांकला त्यांच्या नात्याबद्दल समजलं होतं. या दोघांनी 25 ऑक्टोबरला भेटले आणि शशांकच्या हत्येचा कट रचला. यासाठी ती पहाटे जीममध्ये जाईल तेव्हा प्रताप घरी येऊन शशांकची हत्या करेल. त्याला घरात सहज घुसता यावं म्हणून प्रियाने घराचे दार उघडे ठेवले होते.

दरम्यान पोलिसांनी सांगितलं की, शशांकच्या भावाच्या तक्रारीच्या आधारे प्रताप सिंग आणि प्रिया शर्मा यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट यासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तर हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकूही जप्त करण्यात आलाय. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES