SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कोण होता दानव 'अकवान'? चक्रीवादळाला का देण्यात आलंय राक्षसाचं नाव, 1000 वर्षांपूर्वींची कथा

बंगालच्या उपसागरात तिसरे वादळ. 11 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 20, 2026, 09:17 IST | Updated: Nov 20, 2026, 09:19 IST
Image Credit: Cyclone Akvan explained What does the name mean who named it
Join

अर्णब  आणि मुरासू चक्रीवादळाला अद्याप महिनाही सरला नाही. तर तिसरे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात घोंगावत असून आज आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. या चक्रीवादळाचे नाव अकवान असं आहे. अकवान चक्रीवादळ 20 नोव्हेंबर रोजी आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर 120 ते 130 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत. वाऱ्याची वेग 145 किमी वाहण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

चक्रीवादळाचे नाव अकवान का ठेवण्यात आलं आहे. असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? अकवान म्हणजे काय? या नावाचा अर्थ काय? जाणून घ्या. खरं तर या नावामागे फारशी साहित्यातील एक गोष्ट आहे. फारसी साहित्य आणि अकवान नावाची ही गोष्ट काय जाणून घेऊयात.

अकवान चक्रीवादळाचे नाव ईराणने सुचवलं आहे. जागतिक हवामान संघटना (WMO) उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांना नावे देण्यासाठी एक समिती यादी ठेवते. या यादीतील नावे एका क्रमाने त्या वादळांना नावे दिली जातात.

जेव्हा एखाद्या चक्रीवादळाला नाव देण्याची वेळ येते तेव्हा त्या यादीत पहिले उपलब्ध असलेले नाव दिले जाते. चक्रीवादळांची नावे त्यांच्या तीव्रतेशी, वेगाशी किंवा भूभागावर धडकण्याच्या ठिकाणाशी थेट संबंधित नसतात. ही नावे संबंधित देशांकडून अगोदरच सुचवली जातात आणि एका पूर्वनिश्चित क्रमाने वापरली जातात.

अकवान चक्रीवादळाचे नाव, 10 व्या शतकातील महान पर्शियन कवी फिरदोसी यांनी रचलेल्या 'शाहनामा' या प्रसिद्ध पर्शियन महाकाव्याशी जोडलेले आहे. त्यात अकवान-ए-दिव नावाच्या एका शक्तिशाली आणि मायावी राक्षसाचा उल्लेख आहे. कथेनुसार, अकवानकडे रूप बदलण्याची विलक्षण शक्ती होती. लोकांना फसवण्यासाठी तो अनेकदा जंगली गाढवाचे रूप धारण करत असे. या राक्षसाच्या नावावरून इराणने चक्रीवादळाला 'अकवान' हे नाव सुचवले. याचे थेट इंग्रजी भाषांतर उपलब्ध नसले तरी, त्यामागील पौराणिक कथा खूपच रंजक आहे.

चक्रीवादळांना नावे का दिली जातात?

प्रत्येक नवीन चक्रीवादळाला एक वेगळे नाव देण्याची गरज का आहे? हवामानाची माहिती आणि आपत्ती व्यवस्थापनाची देवाणघेवाण सुलभ करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. अक्षांश आणि रेखांश यांसारख्या गुंतागुंतीच्या माहितीच्या आधारे चक्रीवादळ ओळखणे सामान्य लोकांसाठी कठीण असू शकते. मच्छीमार, मदत आणि बचाव पथके, प्रशासन आणि प्रसारमाध्यमांनाही ही माहिती लक्षात ठेवण्यात अडचण येते. त्यामुळे, वादळाला एक छोटे आणि सहज लक्षात राहणारे नाव दिल्याने त्याबद्दलची माहिती पसरण्यास मदत होते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES