SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारतातील 13 राज्यांना IDM चा अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, समुद्रात उंच लाटा उसळणार

Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman ( 17 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान ): बंगलाच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ काही तासांत किनापट्टीवर धडकणार आहे. भारतातील 13 राज्यांना हवामान विभागने अलर्ट जारी केला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 17, 2026, 00:02 IST | Updated: Nov 17, 2026, 00:05 IST
Join

17 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान :  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ वेगाने पुढे सरकत आहे. 17 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. दक्षिण भारतातील अनेक राज्यांना या वादळाचा तडाखा बसणार आहे.  भारतीय हवामान विभागाने (IMD) 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट जारी केला आहे. 

तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ, माहे, आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि अंदमान व निकोबार यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसाठी इशारा देण्यात आला आहे. वाऱ्याचे वेग ताशी 100 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

पुढील काही दिवसांत दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 17 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
18 आणि 19 नोव्हेंबर रोजी  किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि यानममध्ये पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. याच काळात रायलसीमामध्येही पावसाची शक्यता आहे. बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार आणि ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर भारतात थंडीसोबत धुक्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान दिल्ली, चंदीगड, हरियाणा आणि पंजाबमध्ये दाट धुके पडण्याच अंदाज आहे. 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान उत्तर प्रदेशच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES