• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /SIR प्रक्रियेदरम्यान फॉर्म-6 मध्ये बदल कोणी केला? निवडणूक आयोगाला विचारणार 48 प्रश्न ?

SIR प्रक्रियेदरम्यान फॉर्म-6 मध्ये बदल कोणी केला? निवडणूक आयोगाला विचारणार 48 प्रश्न ?

इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टात नवा अर्ज केला आहे. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली आहे. 48 लेखी प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी मागितली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 16, 2026, 23:21 IST|Updated: Nov 16, 2026, 23:22 IST
joinshare
SIR प्रक्रियेदरम्यान फॉर्म-6 मध्ये बदल कोणी केला? निवडणूक आयोगाला  विचारणार 48 प्रश्न ?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
भारतातील 13 राज्यांना IDM चा अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, समुद्रात उंच लाटा उसळणार

भारतातील 13 राज्यांना IDM चा अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, समुद्रात उंच लाटा उसळणार

2

SIR प्रक्रियेदरम्यान फॉर्म-6 मध्ये बदल कोणी केला? निवडणूक आयोगाला विचारणार 48 प्रश्न ?

3

अमिताभ-अभिषेक बच्चन यांना धमकीवरुन 2 गँगस्टर एकमेकांना भिडले; सोशल मीडियात पेटलं गँगवॉर!

4

गर्लफ्रेंड, रेस्तराँ आणि खास आठवण... राहुल गांधींच्या खासगी आयुष्यातील किस्सा चर्चेत; गर्लफ्रेंड कोण याची चर्चा?

5

काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी! नियुक्तीची अधिकृत घोषणा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राहुल गांधी :  राहुल गांधींसह इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टात नवा दाखल अर्ज केला आहे. या अर्जाद्वारे निवडणूक आयोगाला तब्बल 48 लेखी प्रश्न विचारण्याची परवानगी मागण्यात आली आहे. आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांसह महासंचालकांना या प्रश्नांची उत्तरे प्रतिज्ञापत्रावर देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून विरोधकांनी सुप्रीम कोर्टात आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टात नवा अर्ज दाखल केला आहे. या अर्जाद्वारे निवडणूक आयोगाला तब्बल 48 लेखी प्रश्न विचारण्याची परवानगी मागण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या महासंचालकांना या प्रश्नांची उत्तरे प्रतिज्ञापत्रावर देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रश्नांचा मुख्य रोख मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेवर म्हणजेच SIR वर आहे. या प्रक्रियेतील निर्णय कोणाच्या संमतीने घेण्यात आले, आयोगातील सर्व सदस्यांची त्याला सहमती होती का आणि मतदारांच्या नोंदींमध्ये बदल करण्याचे अधिकार नेमके कोणाकडे होते, असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. 

निवडणूक आयोगाचे निर्णय खरोखरच एकमताने झाले का?

निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात SIR संदर्भातील महत्त्वाचे निर्णय आयोगाच्या तिन्ही सदस्यांनी एकमताने घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, या दाव्याला ठोस कागदपत्रांचा आधार देण्यात आलेला नाही, असा याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. 
राहुल गांधींसह इंडिया आघाडीने उपस्थित केलेले प्रश्न
SIR संदर्भातील निर्णय कोणत्या बैठकीत घेण्यात आले?
निर्णयांची तारीख आणि फाईल क्रमांक काय आहेत?
तिन्ही निवडणूक आयुक्तांनी संमती कधी दिली?
निर्णय बैठकीत, फाईल फिरवून की इलेक्ट्रॉनिक माध्यमातून घेण्यात आले?
कोणत्याही आयुक्ताने निर्णयाला विरोध किंवा आक्षेप घेतला होता का?

निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रालाही आव्हान

आयोगाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्राला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि अन्य दोन निवडणूक आयुक्तांची मंजुरी होती का, असा थेट सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. ही मंजुरी नेमकी कशी देण्यात आली? त्यासाठी बैठक झाली होती का? फाईलवर मंजुरी दिली होती की ई-मेल अथवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संमती देण्यात आली होती? याची माहिती मागण्यात आली आहे. तसेच प्रतिज्ञापत्रातील मजकुरात कोणत्याही आयुक्ताने बदल सुचवले होते का, याचाही खुलासा मागितला आहे. 

फॉर्म-6 मध्ये बदल कोणी केला?

नवीन मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी फॉर्म-6 वापरला जातो.SIR प्रक्रियेदरम्यान ऑनलाइन फॉर्म-6 अर्जामध्ये अतिरिक्त घोषणापत्र समाविष्ट करण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आहे. हे घोषणापत्र कोणी समाविष्ट केले? त्यासाठी निवडणूक आयोगाची अधिकृत मंजुरी होती का? तिन्ही आयुक्तांची सहमती घेतली होती का? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. या घोषणापत्रामुळे किंवा मतदारांच्या नोंदींच्या जुळवणीशी संबंधित अटींमुळे किती अर्ज नाकारण्यात आले, प्रलंबित ठेवण्यात आले किंवा त्यावर प्रक्रिया झाली नाही, याची आकडेवारीही मागण्यात आली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने हे अतिरिक्त घोषणापत्र म्हणजे कायदेशीर फॉर्म-6 मध्ये केलेला बदल नसून स्वतंत्र दस्तऐवज असल्याचे स्पष्ट केले आहे. 

ECINET प्रणालीवरून मतदारांच्या नोंदींमध्ये बदल?

निवडणूक आयोगाच्या ECINET या डिजिटल प्रणालीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मतदार यादीतील नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा बदलणे यासाठी अधिकृत निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याचा आदेश आवश्यक होता का, याची माहिती मागण्यात आली आहे.

अनेक मुद्द्यांवर मागितला  खुलासा 

ECINET प्रणालीद्वारे मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे हटवण्यात आली होती का?
खासगी कंत्राटदार किंवा बाहेरील संस्थांना मतदार यादीतील माहिती बदलण्याचे अधिकार होते का?
मतदारांची नोंद हटवणाऱ्या व्यक्तीची ओळख, तारीख आणि वेळ नोंदवली जात होती का?
एकदा हटवलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध होती का?
मतदार यादीच्या डेटाबेसचे ऑडिट करण्याबाबत निवडणूक आयुक्त विवेक जोशी यांनी काही प्रस्ताव दिला होता का?
या सर्व बाबींची अधिकृत नोंदींसह उत्तरे देण्याची मागणी करण्यात आली आहे. 
मतदार यादीतून वगळलेल्या नावांची राज्यनिहाय माहिती मागितली. 
SIR प्रक्रियेदरम्यान मसुदा आणि अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांची राज्यनिहाय आणि केंद्रशासित प्रदेशनिहाय माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
नावे वगळण्यामागील कारणे कोणती होती, याचाही तपशील मागितला आहे.
यामध्ये मृत्यू, स्थलांतर, मतदार अनुपस्थित असणे, दुबार नोंदणी किंवा अपात्रता अशा कारणांचा समावेश आहे.
तसेच फॉर्म-7 अंतर्गत दाखल झालेल्या हरकतींची संख्या, बूथ लेव्हल एजंटनी दाखल केलेल्या हरकती, अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींच्या नावाने दाखल झालेल्या हरकती आणि त्यावर झालेली कारवाई याची माहिती मागण्यात आली आहे.

इंडिया आघाडीतील कोणते नेते याचिकेत?

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, आरजेडीचे तेजस्वी यादव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय राऊत, सीपीआय(एम)चे एम. ए. बेबी, सीपीआयचे डी. राजा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या महुआ माजी यांच्यासह अन्य नेते याचिकाकर्त्यांमध्ये आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Rahul Gandhi
Indian Politics