एक वादळ शांत होण्याआधीच दुसरं महाभयानक वादळ! भारताच्या हवामानात डेंजर बदल, अनेक राज्यांना अलर्ट
Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman ( 1 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान ): बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे आणखी एका चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
1 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान : बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि लगतच्या अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. गेल्या सहा तासांत ही प्रणाली ताशी 30 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे. सध्या हे क्षेत्र चेन्नईपासून सुमारे 960 किलोमीटर, विशाखापट्टणमपासून 980 किलोमीटर, मच्छलीपट्टणमपासून 1 हजार 30 किलोमीटर आणि ओंगोलपासून 1 हजार 80 किलोमीटर अंतरावर आहे.
1 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे खोल कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. उद्या त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज असून, त्यानंतरच्या दिवशी पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात ते तीव्र चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते. मंगळवारी पहाटे हे चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सकाळी नेल्लोर ते नरसापूरमदरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हे तीव्र चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज** आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील तीन दिवस दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (APSDMA) व्यवस्थापकीय संचालक प्रखर जैन यांनी केले आहे.
या नवीन चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल होणार आहे. अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या मते, यामुळे 2 नोव्हेंबर रोजी किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि यानममध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यचता आहे. 3 नोव्हेंबर रोजी अतिवृष्टी होईल. रायलसीमामध्ये 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी, तर ओडिशामध्ये 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीचा अलर्ट देण्यात आला आहे.