SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आता वाईन शॉप्सबाहेर डॉक्टरांची ड्युटी! आधी ब्लड टेस्टसाठी रक्त द्यायचं मगच खरेदी करता येणार दारू; विक्रेत्यांनाही 'या' कामाला जुंपलं

दारू आणण्यासाठी वाईन शॉपवर जाणाऱ्यांना दारु विकत घेण्याआधी तिथे बसलेल्या डॉक्टरांची भेट घ्यावी लागली तर? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण हे शक्य झालंय भारतातील एका राज्यात

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 25, 2026, 12:24 IST | Updated: Nov 25, 2026, 12:40 IST
Image Credit: कशासाठी राबवली जातेय ही मोहिम? (फोटो पीटीआय आणि सोशल मीडियावरुन साभार)
Join

'दारू नही रे ये दवा है' हा 'हेराफेरी' चित्रपटामधील बाबू भाईचा डायलॉग आपल्यापैकी अनेकांना आजही लक्षात आहे. मात्र दारूच्या सेवानामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि दूषित दारूच्या सेवाने होणारे मृत्यू यामुळे आता दारुच्या दुकानांबाहेर थेट डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दारु घेण्याआधी ब्लड टेस्ट करावी लागणार असून रक्त दिल्यानंतरच दारु मिळणार असं चित्र दिसत आहे. हा अनोखा निर्णय देशातील कोणत्या राज्याने आणि का घेतलाय जाणून घेऊयात...

कुठे सुरु आहे हा प्रकार?

खरं तर दारूच्या दुकानात जाणाऱ्या ग्राहकांना दुकानासमोरच खुर्ची-टेबल टाकून बसलेले डॉक्टर भेटतील आणि ते त्यांच्या आरोग्यासंदर्भातील चौकशी करुन तपासणी करतील असा विचारही विचित्र वाटतो. मात्र हे चित्र सत्यात अवतरलं आहे ते मध्य प्रदेशातील बुंदेलखंडमध्ये! येथे दारूच्या दुकानांबाहेर वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके ग्राहकांची आरोग्य तपासणी करत असून रक्ताचे नमुने गोळा करत आहेत. या पथकांकडून सर्वच ग्राहकांना मद्यपानाचं प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला जातोय.

दुकानदारांना दिलं यादी बनवायचं काम

मध्य प्रदेशातील सागर जिल्हा प्रशासनाने तर याही पुढे जात अजून एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. दुकान उघडण्यापूर्वीच येऊन बसणाऱ्या ग्राहकांची यादी बनवण्याचे आदेश प्रशानाने दारू दुकान चालकांना दिली आहे. तसेच  नियमित येणाऱ्या ग्राहकांचीही यादी तयार करण्यास सांगण्यात आलं आहे.  अशा दीर्घकाळ मद्यपान करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांची तपासणी करण्यासाठी दुकानाबाहेर बसलेल्या डॉक्टरांना सहज शक्य व्हावं यासाठी या याद्या तयार करण्यास सांगण्यात आलं आहे.

मोहिमेचा उद्देश काय?

सप्टेंबर महिन्यात बनावट दारूमुळे झाल्याचा संशय असलेल्या दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू झाला होता. यासह जिल्ह्यात घडलेल्या मृत्यूंच्या अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासंदर्भात सागरचे जिल्हाधिकारी दिलीप कुमार यादव यांनी 'द इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना दीर्घकाळ आणि अतिप्रमाणात मद्यपान केल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्याच्या उद्देशाने ही मोहिम सुरु केली आहे. आधीपासून इतर आजार असलेल्या आणि योग्य पोषण न मिळणाऱ्या व्यक्तींना मद्यपानाचा अधिक धोका असतो. अतिप्रमाणात मद्यपान करण्यांबद्दल आम्हाला अधिक चिंता वाढतेय. विशेषतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर दारू पिणाऱ्या व्यक्तींबाबत आम्ही अधिक सतर्क आहोत, असं यादव यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रशासनाची मुख्य चिंता काय?

दुकान चालकांना नियमित दारू पिणाऱ्या ग्राहकांची बऱ्यापैकी माहिती असल्याने त्यांची मदत घेतली जात असल्याचं यादव यांनी सांगितलं. "आमची मुख्य चिंता अतिप्रमाणात मद्यपान करण्याबाबत आहे. विशेषतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर दारू पिणाऱ्या व्यक्तींबाबत आम्ही अधिक सतर्क आहोत. काही लोकांना आधीपासूनच इतर आजार किंवा सहव्याधी असतात. या सर्व कारणांमुळे त्यांच्या आरोग्याला अधिक धोका निर्माण होतो. या उपक्रमाकडे जनजागृती मोहीम म्हणून पाहिलं जावं," अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली.

किती जणांची तपासणी झाली?

दारूच्या दुकान चालकांची मदत घेण्याचे कारण स्पष्ट करताना यादव म्हणाले की,  चांगली माहिती असते. हा उपक्रम रविवारी सुरू करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी बांदा आणि सागर येथे सुमारे 50 जणांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी सागर, देवरी, रहली, खुरई आणि बिना या भागांत मिळून 97 जणांची तपासणी करण्यात आली. दोन दिवसांत वैद्यकीय पथकांनी एकूण 147 जणांची तपासणी केली. त्यापैकी 144 जणांचे यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेची तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. तपासणी केलेल्या व्यक्तींचे मोबाईल क्रमांकही नोंदवून ठेवले जात आहेत. रक्त तपासणीचे अहवाल आल्यानंतर संबंधित व्यक्तींशी संपर्क साधता यावा, हा त्यामागील उद्देश आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES