• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /सरकारी कर्मचारी बेपत्ता झाल्यास कुटुंबाला पेन्शन मिळते? ग्रॅच्युइटीपासून PF पर्यंतचे नियम जाणून घ्या

सरकारी कर्मचारी बेपत्ता झाल्यास कुटुंबाला पेन्शन मिळते? ग्रॅच्युइटीपासून PF पर्यंतचे नियम जाणून घ्या

सरकारी कर्मचारी बेपत्ता झाल्यास पत्नी, मुलांना फॅमिली पेन्शन, ग्रॅच्युइटी, पीएफ आणि इतर लाभ मिळतात का? केंद्र सरकारचे नियम आणि महाराष्ट्रातील तरतुदी जाणून घ्या.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 25, 2026, 15:57 IST|Updated: Nov 25, 2026, 16:14 IST
joinshare
सरकारी कर्मचारी बेपत्ता झाल्यास कुटुंबाला पेन्शन मिळते? ग्रॅच्युइटीपासून PF पर्यंतचे नियम जाणून घ्या
Image Credit: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल

24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल

2

कात्रज प्रकरण नेमकं काय? ज्यामुळे न्यायालयाच्या बाहेरच मंदार किवळेला संपण्याचा झाला प्रयत्न!

3

धक्कादायक! 19 वर्षीय मुलीची आई-वडिलांकडून हत्या; गोळ्या खाऊनही मेली नाही म्हणून उशीने दाबलं तोंड, कारण त्याहून हादरवणारं, गर्भवती...

4

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; तीन महिने मोफत धान्य मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका, वाचा 14 निर्णय

5

सरकारी कर्मचारी बेपत्ता झाल्यास कुटुंबाला पेन्शन मिळते? ग्रॅच्युइटीपासून PF पर्यंतचे नियम जाणून घ्या

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सरकारी नोकरी म्हणजे आर्थिक सुरक्षितता, निवृत्तिवेतन आणि कुटुंबाला मिळणारे विविध लाभ, असे समीकरण अनेकांच्या मनात असते. मात्र, एखादा सरकारी कर्मचारी अचानक बेपत्ता झाला आणि त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही, तर त्याच्या कुटुंबाचे काय होते? पत्नी किंवा मुलांना पेन्शन मिळते का? ग्रॅच्युइटी आणि भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची रक्कम मिळवण्यासाठी सात वर्षे वाट पाहावी लागते का? या प्रश्नांबाबत केंद्र सरकारच्या पेन्शन विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्र शासनानेही बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी स्वतंत्र तरतुदी केल्या आहेत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

केंद्र सरकारकडून महत्त्वाचे निर्देश

केंद्र सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तिवेतन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने नियम स्पष्ट केले आहेत. सरकारी कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा तो बेपत्ता झाल्यास कुटुंबाला कोणते आर्थिक लाभ मिळू शकतात, याची प्रक्रिया यात सांगण्यात आली आहे. कुटुंबीयांना माहितीअभावी लाभ मिळण्यास होणारा विलंब कमी करणे हा यामागील उद्देश आहे.


कुटुंबाला कोणते आर्थिक लाभ मिळू शकतात?

कर्मचारी बेपत्ता झाल्यास पात्र कुटुंबीयांना नियमांनुसार खालील लाभांसाठी दावा करता येतो.
फॅमिली पेन्शन : पात्र पत्नी, पती किंवा अन्य कुटुंबीयांना नियमानुसार कुटुंब निवृत्तिवेतन.
ग्रॅच्युइटी : निवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान, लागू नियमांनुसार.
GPF : जनरल प्रॉव्हिडंट फंडमधील पात्र शिल्लक.
लीव्ह एनकॅशमेंट : शिल्लक अर्जित रजेचे रोखीकरण.
CGEGIS : केंद्र सरकारी कर्मचारी गट विमा योजनेचा लाभ.
इतर थकबाकी : नियमांनुसार थकीत वेतन, प्रवास भत्ता आणि काही वैद्यकीय लाभ.

 

पहिल्या सहा महिन्यांत पेन्शन आणि ग्रॅच्युइटी मिळते ?

हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार, कर्मचारी बेपत्ता झाल्याची पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत फॅमिली पेन्शन आणि रिटायरमेंट ग्रॅच्युइटीची प्रत्यक्ष रक्कम दिली जात नाही. मात्र या काळात कुटुंबीयांनी संबंधित कार्यालयाकडे दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ठेवणे आवश्यक आहे. सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे, पोलिसांचा अहवाल आणि इतर अटींची पूर्तता झाल्यास नियमानुसार आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे सात वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणतीही मदत मिळत नाही, हा समज चुकीचा आहे.

सात वर्षांनंतर काय बदलते?

भारतीय पुरावा अधिनियमातील तरतुदीनुसार, एखादी व्यक्ती सात वर्षे बेपत्ता असून तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नसेल, तर कायदेशीर प्रक्रियेनुसार तिच्या मृत्यूबाबत गृहीतक लागू होऊ शकते. याचा अर्थ कुटुंबाला सात वर्षे आर्थिक मदतीसाठी थांबावे लागते असा नाही. केंद्र सरकारच्या नियमांनुसार, सुरुवातीला रिटायरमेंट ग्रॅच्युइटी देण्याची तरतूद आहे. त्यानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू निश्चित झाल्यास किंवा बेपत्ता झाल्यापासून सात वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर लागू होणाऱ्या नियमांनुसार डेथ ग्रॅच्युइटी आणि आधी दिलेल्या रकमेतील फरक मिळू शकतो.

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय आहेत नियम?

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 5 जुलै 1991 रोजी बेपत्ता सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांच्या कुटुंबासाठी शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार, पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर सुरुवातीला कर्मचाऱ्याचे थकीत वेतन, रजा रोखीकरण आणि जीपीएफमधील रक्कम देण्याची तरतूद आहे.तक्रार दाखल केल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर पात्र कुटुंबीयांना नियमानुसार फॅमिली पेन्शन आणि ठरावीक मर्यादेपर्यंत ग्रॅच्युइटी मिळू शकते. सात वर्षांनंतर किंवा मृत्यू निश्चित झाल्यानंतर ग्रॅच्युइटीमधील उर्वरित फरक देण्याची तरतूदही या निर्णयात आहे.महाराष्ट्राचे हे नियम आणि केंद्र सरकारचे CCS पेन्शन नियम वेगवेगळे आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्याची सेवा कोणत्या नियमांखाली आहे, यानुसार लाभ निश्चित होतात.


कुटुंबीयांनी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी?

कर्मचारी बेपत्ता झाल्यास कुटुंबीयांनी काही महत्त्वाच्या गोष्टी तातडीने करणे आवश्यक आहे. संबंधित पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवावी. एफआयआर किंवा लागू प्रक्रियेनुसार स्टेशन डायरी/जनरल डायरी नोंद घ्यावी.पोलिसांकडून शोध घेऊनही कर्मचारी सापडला नसल्याचा अहवाल प्राप्त करावा. कर्मचारी ज्या सरकारी कार्यालयात शेवटचे कार्यरत होते, त्या कार्यालयाच्या प्रमुखांकडे अर्ज करावा.तसेच बँक खाते, नामनिर्देशनाची माहिती, सेवा तपशील आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
PF
india