SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पत्नीला पती वारंवार माहेरी पाठवायचा, तिला आला संशय; घरात CCTV लावलं अन् मग जे समोर आलं ते धक्कादायक

लग्नापासूनच त्यांच्या नात्यात तणाव होता, तो अनेक वेळा तिला मारायचा आणि वारंवार तिला माहेरी पाठवायचा. संशय वाढत गेल्याने पत्नीने अखेर घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावला आणि मग...

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 28, 2026, 15:54 IST | Updated: Nov 28, 2026, 22:00 IST
Image Credit: affair cctv footage
Join

पती - पत्नीचं नातं विश्वास आणि प्रेमावर उभं असतं. यातील एकही गोष्ट नसेल तर त्या नात्यात तणाव निर्माण होतो. गुजरातमधील अहमदाबादमध्ये पती - पत्नीच्या नात्यातील एक धक्कादायक सत्य समोर आलं. 27 वर्षीय महिलेला तिचा नवरा वारंवार माहेरी पाठवत होता, तिला मारहाण करायचा. त्यामुळे नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे पत्नीला वेगळाच संशय आला. त्याच्यातील नात्याबद्दल तिला शंका आली. तेव्हा तिने सत्य जाणून घेण्यासाठी घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. या कॅमेऱ्यात नवऱ्याचे असं सत्य समोर आलं ज्यामुळे तिच्या आयुष्यात वादळ आलं. 

त्यानंतर पत्नीने पतीला हे फुटेज दाखवत जाब विचारला, तेव्हा त्याने हे कोणाला सांगायचं नाही अशी धमकी दिली. तो जे सांगेल ते तिला करावे अशी धमकी तो देत होता. अखेर पतीच्या वागण्यामुळे त्रस्त होऊन तिने पोलिसांकडे नवऱ्याची तक्रार आली. ही घटना अहमदाबादच्या दरीयापूरमधील आहे. माधवपुरा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे. 

महिलेने पोलिसांना तक्रारीत सांगितलं की, या महिलेने 2017 मध्ये सदर व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला होता. त्याने लग्नानंतर लगचेच तिच्यासोबत मारहाण केली. 2020 मध्ये त्यांना पहिलं मुलं झालं. त्यावेळी पतीने फार असं कारण नसतानाही त्याला दोन ते तीन वेळा मारहाण केली. 

याच दरम्यान आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय तिला आला. यावरून त्यांच्यामध्ये वादही झाला. त्यानंतर ती मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. एवढंच नाहीतर कोर्टातही तिने धाव घेतली. पण नातेवाईकांनी मध्यस्थी केली आणि परत दोघांना एकत्र आणलं. त्यानंतर महिलेने आपली तक्रार मागे घेतली. 

त्यानंतर या दोघांनी सारसपूर परिसरात एक घर विकत घेतलं. पण तरीही नात्यात संशय असल्याने त्यांच्यात दुसरी कोणी महिला आहे यावरून सतत वाद होत होते. पत्नीने सांगितलं की, तिचा नवरा तिला मारहाण करायचा आणि खोटे कारण सांगत तिला वारंवार माहेरी पाठवायचा. 

त्याच्या या वागणुकीमुळे तिचा संशय नवराबद्दल अधिक बळावला. अखेरीस, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवायचं तिने ठरवलं. त्यासाठी तिने घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला. मग तिने या कॅमेऱ्यातील फुटेज तपासले तेव्हा तिचा नवरा दुसऱ्या महिलेला घरी आणतो, हे दिसून आलं. याचा जबाव पतीला विचारल्यावर त्याने तिला शांत राहण्यास सांगितलं. एवढंच नाहीतर वाद घालत होता. त्यामुळे अखेर तिने माधवपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.  तिने आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES