SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

PM मोदींच्या आवाहनानंतर खरंच सोन्याचे दर कमी? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोन्याच्या खरेदीसंदर्भातील विधानावरूनही त्यांनी टीका केली. काय म्हणाले संजय राऊत? सविस्तर जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 22, 2026, 13:37 IST | Updated: Nov 22, 2026, 14:07 IST
Image Credit: संजय राऊत
Join

खासदार संजय राऊत यांनी मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी खासदारांना प्रत्येकी 150 कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. तसेच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. दुसरीकडे, टिपू सुलतान यांच्याबाबत केंद्र सरकारने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोन्याच्या खरेदीसंदर्भातील विधानावरूनही त्यांनी टीका केली. काय म्हणाले संजय राऊत? सविस्तर जाणून घेऊया.

टिपू सुलतानबद्दल केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करा

टिपू सुलतान यांच्या इतिहासावरून सुरू असलेल्या वादावर संजय राऊत यांनी केंद्र सरकारला भूमिका जाहीर करण्याचे आवाहन केले. टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढताना मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे देशातील मोठा वर्ग त्यांना वीर मानतो, असे राऊत म्हणाले. त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील काही सरदारांचे सैन्यही इंग्रजांविरोधात लढले असावे, असा उल्लेख त्यांनी केला. यामध्ये सांगलीच्या पटवर्धन सरदारांचा संदर्भही त्यांनी दिला.

डिमिलिटेशन विधेयकासाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर?

संजय राऊत यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजपवर गंभीर आरोप केले. या विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी खासदारांना प्रत्येकी 150 कोटी रुपये देण्याची ऑफर दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला. पक्ष फोडण्यात अपयश आल्यास संबंधित पक्षातील खासदारांना वैयक्तिक पातळीवर संपर्क साधून फोडण्याचे प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले. द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या कथित राजकीय रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले.


'महाराष्ट्रातून पैसा गोळा केला जातोय'

या कथित ऑफरसाठी पैसा कुठून येणार, असा सवाल करत राऊत यांनी महाराष्ट्रातील प्रकल्पांवर बोट ठेवले. एसआरए प्रकल्प आणि नगरविकास खात्याशी संबंधित कामांमध्ये नियमबाह्य व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 1500 कोटी रुपयांचे लक्ष्य देण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांचाही त्यांनी उल्लेख केला. हे सर्व आरोप असून, संबंधित प्रकल्पांमधील कथित गैरव्यवहार किंवा आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप आवश्यक आहे.

सोनं खरेदीच्या मुद्द्यावरून मोदींवर निशाणा

सोनं खरेदीच्या मुद्द्यावरु राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.  त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. या क्षणी ते काहीही बोलत आहेत.अखेरची घरघर जेव्हा त्याचा पंतप्रधान पदाला लागते कोणाच्याही तेव्हा अशी वक्तव्य होत असतात या देशाचा आर्थिक नियोजन पूर्णपणे ढासळलंय. तुम्ही सांगितलं सोनं घेऊ नका म्हणून लोकांनी सोनं घ्यायचं थांबवलं नाही. तुम्ही सांगितलं सोनं घ्या म्हणून सोन घेत नाहीत. तुम्ही कधीतरी हे सांगा देश अडाणीला विकू नका. हे कधी बोलत आहात का? गरिबांना का सांगत आहात सोनं घेऊ नका म्हणून? असा प्रश्न त्यांनी विचारला. गौतम अदानी आणि अंबानी यांनी सगळं घ्यायचं. त्यांना तुम्ही रोखत नाही. विमानतळ यांची, बंदर याची. यांनीच जमिनी घ्यायच्या. धारावी घ्यायची. एसआरए प्रकल्प घ्यायचे. त्यांच्यावर बोला. गरिबांनी सोनं खरेदी करायचा नाही गरीबाने चांदी खरेदी करू नका हे काही पंतप्रधान यांचे काम आहे का? असा प्रश्न यावेळी राऊतांनी विचारला. या देशांमध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा लाल बहादूर शास्त्री उपवास करत होते. एक वेळ जेवत होते. मोदी तसं करणार आहेत का? त्यांनी परदेश दौरे टाळले होते. मोदींना हे जमणार आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

आनंदराज आंबेडकरांच्या वक्तव्याचा निषेध

दिवंगत अजित पवार यांच्याबाबत आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याला संजय राऊत यांनी चुकीचे म्हटले. दिवंगत व्यक्तीबाबत अशा प्रकारे बोलणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. पाऊसच पडला नाही तर पाणी अडवायचे कुठून आणि जिरवायचे कुठे, असा सवाल करत त्यांनी सरकारच्या कामकाजावर उपरोधिक टिप्पणी केली. 'पैसा अडवा आणि पैसा जिरवा' अशी घोषणा सरकारने द्यावी, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे विरोधकांच्या आरोपांना उत्तर नसल्याचा दावाही राऊत यांनी केला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES