SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सोन्याचा दर 1.02 लाखावर आला; 2024-2025 च्या दरात सोनं मिळणार?

सोनं चांदीच्या दरात प्रचंड मोठी घरसण झाली आहे. येत्या काही दिवसात सोन्याचे दर आणकी घसरण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही दिवसांत 2024-2025 च्या दरात सोनं मिळू शकते असाही दावा केला जात आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 16, 2026, 21:06 IST | Updated: Nov 16, 2026, 21:11 IST
Join

Gold Rate :  सोनं चांदीच्या दरात प्रचंड मोठी घसरण झाली आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 1.02 लाखांवर आला आहे. 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दर घसरले आहेत. चांदीच्या दरातही मोठी घरसण झाली आहे. सोमवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात 2,300 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली.  सोन्याचे दर 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सध्याची घरसण पाहता हा अंदाज खरा ठरत असल्याचे दिसत आहे. 

2026 मध्ये सोनं चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा दर 2.30 लाख रुपये होता. 29 जानेवारी 2026 रोजी चांदीचा दर 3.86 लाख रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. चांदीचे दर 2.2  लाख रुपयांनी घसरले आहेत. चांदी 114 टक्क्यांनी  स्वस्त झाली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी सोन्याचा दर 1.33 लाख होता. 29 जानेवारी रोजी तो एक तोळा सोन्याचा दर 1.76 लाखांच्या उच्चांकावर पोहोचला. तेव्हापासून सोने 40,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोनं 30 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.

सोमवारी, एमसीएक्सवर फ्युचर्स ट्रेडिंग सुरू होताच सोनं चांदीचे दर घसरले. 4 डिसेंबरला मुदत संपणाऱ्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 1,36,705 रुपयांवर बंद झाला. संध्याकाळच्या सत्रात सोन्याचा दर 1,35,312 रुपयांपर्यंत घसरला. अल्पावधीत आंतरराष्ट्रीय स्पॉट सोन्याच्या दरात प्रति औंस 4,025 ते 3,950 डॉलर्सपर्यंत संभाव्य घसरण होऊ शकते. भारतीाय सराफा बाजारात सोन्याचा दर 1 ते 1.25 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. अमेरिकेने 10 -वर्षीय बॉण्डवरील परतावा (यील्ड) आणखी वाढवला तरच हे घडू शकते.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयावर गोल्डमार्केटटी पुढील स्थिती अवलंबून आहे. 17 नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील किरकोळ विक्रीची आकडेवारी जाहीर होणार आहे. 18 नोव्हेंबर रोजी एफओएमसीच्या बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध होणार आहे. याचा सोने आणि चांदीच्या दरांवर थेट परिणाम होणार आहे.

परकीय निधीचा ओघ आणि कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे रुपया 27 पैशांनी मजबूत झाला आहे. रुपया प्रति डॉलर 93.92 वर बंद झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 17 डॉलरने घसरून प्रति औंस 3,869 डॉलरवर आला, तर चांदीचा दरही 3.59% ने घसरून प्रति औंस 47.366 डॉलरवर आला आहे. 

गोल्ड मार्केटमध्ये सुरु झालेली ही घरसण दीर्घकाळ राहू शकते यामुळे येत्या काही महिन्यात 2024-2025  यावर्षात असलेल्या दरापर्यंत सोन्याचा दर येवू शकतो. 2024 मध्ये सोन्याचा दर  प्रती तोळा 77,913 ते  78,245 रुपयांच्या आपसास होता. तर, 2025 मध्ये एक तोळा सोन्याचा दर 1,01,000 ते 1,36,570 रुपयांच्या दरम्यान होता. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES