SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भाजपच्या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा? हायकोर्टाकडून याचिकाच रद्द; काय घडलंय नेमकं?

भाजपच्या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिल्याच्या आरोपावरून दाखल झालेला खटला कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला. दोन वर्षांचा विलंब, तपासातील त्रुटी आणि सरकारी मंजुरीचा अभाव यांचा निर्णयावर परिणाम झाला.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 05, 2026, 05:37 PM IST | Updated: Nov 05, 2026, 05:57 PM IST
Image Credit: हायकोर्ट निर्णय
Join

भाजपच्या रॅलीमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचे त्याने तक्रारीत म्हटलं. हे प्रकरण हायकोर्टात पोहोचलं पण हायकोर्टने याचिका रद्द केली. हायकोर्टने यामागे काय कारण दिलं? सविस्तर जाणून घ्या. 

नेमकी घटना काय?

कर्नाटकातील मांड्या येथे 18 डिसेंबर 2022 रोजी भाजप समर्थकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान काही जणांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचा दावा तक्रारदार कन्नंबाडी कुमार यांनी केला होता. या घोषणेचा व्हिडीओ पाहून आपल्याला मानसिक त्रास झाल्याचे सांगत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे मांड्या वेस्ट पोलिसांनी 2024 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 153बी आणि 505(1)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

‘जिंदाबाद’ऐवजी ‘मुर्दाबाद’ म्हणायचे होते

या प्रकरणातील याचिकाकर्ते डी. एस. रवी कुमार यांनी कनिष्ठ न्यायालयातील फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. आंदोलनादरम्यान घोषणा देताना चुकून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ऐवजी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे शब्द उच्चारले गेल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. हा प्रकार अनवधानाने घडला असून, समाजात अशांतता निर्माण करण्याचा किंवा कोणत्याही विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता, असेही त्यांनी न्यायालयात सांगितले.

राज्य सरकारचा विरोध

याचिकेला राज्य सरकारने विरोध केला. तक्रारदाराने दिलेल्या व्हिडीओमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा स्पष्टपणे ऐकू येत असल्याने तपास सुरू राहायला हवा, असा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते, असेही सरकारने न्यायालयाला सांगितले. असे असले तरी घटनेची तक्रार  घडलेल्या घटनेनंतर जवळपास दोन वर्षांनी दाखल झाल्याची बाब न्यायालयाने लक्षात घेतली.

तपासातील त्रुटी समोर

न्यायमूर्ती व्ही. श्रीशानंद यांनी तपास यंत्रणेला आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख निश्चित करता आली नाही, तसेच कथित घोषणांमुळे समाजात किंवा सार्वजनिक स्तरावर अशांतता निर्माण झाल्याचेही तपासातून समोर आले नसल्याचे नमूद केले. एवढेच नव्हे तर आयपीसीच्या कलम 505 अंतर्गत खटला चालवण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वसरकारी मंजुरी घेतली नव्हती. कलम 153बी अंतर्गत गुन्ह्याचे आवश्यक घटकही या प्रकरणात लागू होत नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES